Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

रामदास आठवले यांची मागणी, जातनिहाय जनगणना होईपर्यंत अनुसुचित जातींचे उपवर्गीकरण करु नये

अनुसुचित जातीच्या उपवर्गीकरणाला सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल होता. अलिकडे मात्र सर्वोच्च न्यायालयाने ज्या राज्यांना अनुसुचित जातींचे उपवर्गीकरण करावयाचे आहे, त्यांना याबाबतचा निर्णय घेण्यास मोकळीक दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनुसुचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. उपवर्गीकरणामुळे कोणत्याही जातीवर अन्याय होवू नये हीच रिपब्लिकन पक्षाची भुमिका आहे. अनुसुचित …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, देवस्थान इनाम जमीन प्रारूपाला ‘स्थगिती’

महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी नियोजित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, 2026’ च्या सध्याच्या प्रारूपाला स्थगिती देऊन, सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर येथे केली. चंद्रशेखर बावनकुळे पुढे …

Read More »

प्रताप सरनाईक यांचा इशारा, एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी राज्यभर विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी व अंमलबजावणी मोहीम …

Read More »

राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर

पुण्यातील विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर पुढील ७ दिवसात पूर्ण कराव्यात आणि कायदा व नियमातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या संस्थाविरुद्ध कठोर कारवाई करावी असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. कायदयातील तरतुदीचे उल्लंघन बाबत ३ जून …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले. हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक नेतृत्व आणि देदिप्यमान वारशाला वाहिलेली आदरांजली असून, तो महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवतो. …

Read More »

वैद्यकीय उपकरणे नियम २०१७ अंतर्गत मुंबई, ठाणे व पालघर येथे एफडीए चे छापे

भिवंडी, पालघर आणि मुंबई येथील तीन आस्थापनांमधून एकूण ८१ लक्ष किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला असून १ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा सर्जिकल ग्लोव्हज साठा गुणवत्ता चाचणीसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार तपासणी मोहीम कारवाईत औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० …

Read More »

‘एमएसएमई’ची हेल्पलाईन सुरू; उद्योजकांना तज्ज्ञ मार्गदर्शन

राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ सल्ला सहज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र आरएएमपी RAMP (Raising and Accelerating MSME Performance) कार्यक्रमांतर्गत एमएसएमई MSME हेल्पलाईनची सुरूवात करण्यात आली आहे. या हेल्पलाईनद्वारे राज्यभरातील उद्योजकांना पूर्णतः मोफत मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे. सूक्ष्म, …

Read More »

दत्तात्रय भरणे यांचे आदेश, वादळी पावसातील नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा

राज्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे २४ जिल्ह्यात अंदाजे १ लाख ५०० एकराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळण्याच्यादृष्टीने बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीने मदत करण्यात येईल, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. दत्तात्रय भरणे यांनी आज …

Read More »

लंडनमध्ये सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्या कार्यक्रमाला गालबोट, भारताकडून नाराजी व्यक्त

लंडन विद्यापीठाच्या बर्कबेक येथे भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांचे व्याख्यान वादग्रस्त ठरले, उपस्थितांनी भारतातील असंतोषाबद्दलच्या चिंता आणि त्यांच्या अलीकडील “झुरळ” वक्तव्यावरून त्यांना आव्हान दिले, त्यामुळे प्रश्नोत्तराचे सत्र काही काळ तणावपूर्वक बनल्याने व्यत्यय आला. ही घटना ४ जून रोजी सरन्यायाधीशांनी “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा” या विषयावर भाषण दिल्यानंतर घडली. संवादात्मक …

Read More »

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची माहिती, भारतासमोर निर्बंधांचे धोके…

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली “निर्बंधांच्या धमक्यां”द्वारे भारताच्या सार्वभौमत्वाला कमी लेखण्याचा कोणताही प्रयत्न “तात्काळ उलटेल”. गुरुवारी (४ जून, २०२६) रात्री एका वृत्तसंस्थेशी बोलताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी (५ जून, २०२६) सेंट पीटर्सबर्ग येथील वार्षिक आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचावर ही टिप्पणी केली. …

Read More »

कॉकरोच जनता पार्टीकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत एकदिवसीय आंदोलन समाप्त

शनिवारी (६ जून २०२६) ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) सदस्यांनी जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केल्यामुळे दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलांना राजधानीतील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उपहासात्मक ऑनलाइन ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके अमेरिकेतून राजधानीत दाखल झाले असून, त्यांनी “जंतरमंतरवर सर्वांना भेटण्यास मी उत्सुक आहे,” …

Read More »

४ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या प्रमुख  उपस्थितीत शुक्रवारी ‘वर्षा’ निवासस्थानी महाराष्ट्र शासन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील आघाडीची जबिल तसेच दुबईस्थित आरएसए ग्लोबल यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे महाराष्ट्रात ४ हजार ८० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ४ हजार ७५० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होणार …

Read More »

सुनिल तटकरे यांचा टोला, कोकणात ठाकरे सेनेचं अस्तित्व काय, दुर्बिन घेऊन पहा

राष्ट्रवादीचे काँग्रेस (अप) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदर सुनील तटकरे यांनी ठाकरे शिवसेनेवर बाळा माने प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे सेना कोकणात दोन अंकी संख्या गाठण्यात अपयशी ठरली आहे. त्या ठिकाणी आता उद्धव सेनेचे काहीच प्राबल्य नाही. त्यामुळे खासदार विनायक राऊतांनी अगोदर त्याचे आत्मपरीक्षण करावे आणि मग पैसे वाटल्याचा आरोप करावा असा …

Read More »

तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना

तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेद्वारे २५ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेचा उद्देश तृतीयपंथीयांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे, आर्थिक स्वावलंबन प्राप्त …

Read More »

एमपीएससीच्या अंतिम निवडीत हुकलेल्या उमेदवारांना ‘निपुण सेतू’द्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम निवड यादीत स्थान मिळवू न शकलेल्या गुणवंत उमेदवारांसाठी आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. अशा उमेदवारांना खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागामार्फत ‘मैत्री 2.0’ पोर्टल अंतर्गत ‘निपुण सेतू’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) ‘प्रतिभा सेतू’ या उपक्रमाच्या धर्तीवर …

Read More »