Breaking News
चांद्रयान ३

चांद्रयान ३ : चंद्रावर आढळले सल्फर आणि ऑक्सिजन प्रज्ञान रोवरची माहिती इस्त्रोने केली ट्विट

भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेचे आणखी एक यश अधोरेखित करणारी बातमी आहे. चंद्राच्या दक्षिण धृवावर भ्रमंती करणाऱ्या प्रज्ञान रोवरला चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, ध्रुवावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन आढळले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार रोव्हरवर लावलेल्या लेझर ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपने पहिल्यांदा दक्षिण ध्रुवाकडील चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर घटक असल्याची खातरजमा केली आहे. त्यासोबतच चंद्राच्या पृष्ठभागावर अॅल्युमिनियम (Al), सल्फर (S), कॅल्शियम (Ca), लोह (Fe), क्रोमियम (Cr) आणि टायटॅनियम (Ti) चे घटक असल्याचा खुलासा झाला आहे. प्रज्ञान रोव्हरमध्ये बसवण्यात आलेल्या ‘लेझर-इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप’ (LIBS) यंत्राद्वारे ऑक्सिजनचा शोध लागला आहे. एलआयबीएस उपकरण हे इस्त्रोच्या बंगळुरूतील प्रयोगशाळेत बनवण्यात आले आहे. पृथ्वीवर माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन गरजेचे आहे. तेच आता चंद्रावर सापडल्याने भारताच्या मिशनला मोठे यश येताना दिसत आहे. दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध सुरू असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

 

आमचे Youtube चॅनल फॉलो करा

Check Also

आफ्रिकेतील उहुरु शिखरावर फडकवला, भारताचा राष्ट्रीय ध्वज चिकाटी आणि सहकार्य यातून हे ध्वजारोहन साध्य

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हिमालयीन गिर्यारोहण संस्थेच्या दिव्यांगजन मोहिम चमूने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *