Breaking News

इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धावर या अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट जर एखाद्याने मानवी मर्यादा ओलांडल्या आणि त्याचे भयंकर परिणाम होत असतील तर

सध्या  यांच्यात सुरू असलेलं युद्ध अधिक तिव्र झालं असून संपूणर जगाची चिंता वाढवली आहे. गाझा पट्टीजवळ इस्रायली सैन्य, रणगाडे सज्ज आहेत. कुठल्याही क्षणी इस्रायली सैन्य गाझावर हल्ला करतील अशी स्थिती आहे. त्याठिकाणी सध्या तणावग्रस्त वातावरण आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जग हदरलं आहे.

युक्रेन आणि रशियामधील युद्ध अद्याप संपलं नसताना इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्ध सुरु झालं आहे. यामध्ये अनेक नागरिकांना आपला प्रान गमवावा लागला आहे, तर अनेक जण जखमी आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. भारत देखील युद्धाला गांभीर्याने घेत आहे. अशात बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री झीनत अमान यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धावर प्रतिक्रिया दिली आहे.

झीनत अमान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व असल्यामुळे मी कायम राजकारण आणि धर्म या दोन गोष्टींवर बोलणं टाळते. अशा गोष्टींवर मत दिल्याने लोकांच्या भावना दुखावतात हे मला मान्य आहे. एवढंच नाही तर, गंभीर विषयांवर बोलायला मला भीती वाटते कारण माझ्याकडे ते अधिकार नाहीत..पण जर एखाद्याने मानवी मर्यादा ओलांडल्या आणि त्याचे भयंकर परिणाम होत असतील तर मी या गोष्टी समजू शकते

पुढे त्या पोस्टमध्ये म्हणतात की, सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचं चित्र फार भयानक आहे. त्या दृश्यांनी ही पोस्ट लिहिण्यासाठी मला भाग पाडलं. मी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या समर्थनात आहे, जो या प्रसंगी युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करतल आहे आणि पीडित लोकांना मदत करण्याचा त्यांची हेतू आहे. युद्धात ज्या प्रकारे निरपराध बालकांचा बळी जात आहे तो अत्यंत निषेधार्ह आहे. एक माणूस हे दृश्य पाहिल्यानंतर कोणी शांत बसणार नाही.’

पोस्टाच्या शेवटी त्या म्हणतात की , ‘जे या युद्धाच्या विरोधात आहेत, त्यात लोकांसोबत मी आहे. शिवाय जाती-धर्माच्या भेदाला आणि शांतता, स्वातंत्र्य आणि न्यायाचं समर्थन करतात अशा लोकांसोबत मी आहे…’ सध्या सर्वत्र झीनत अमान यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Check Also

अभिनेते प्रकाश राज खिल्ली उडवित म्हणाले, शिकलेला नेता निवडण्यात… पेपरलिक प्रकरणावरून साधला निशाणा

मागील १० वर्षात बिहार, गुजरात, उत्तर प्रदेशात सातत्याने पेपर लिकच्या घटना घडत आलेल्या आहेत. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *