Breaking News

बारामतीत नणंद सुप्रिया सुळे आघाडीवर तर भावजय सुनेत्रा पवार मागे संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता

महाराष्ट्रासह संपूर्ण लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरूध्द पवार असा सामना चांगलाच रंगल्याचे दिसून येत आहे. हा सामना राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवार आणि त्यांचे विद्यपान पुतणे अजित पवार यांच्यात खरा सामना बनला आहे. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि पुतण्या अजित पवार यांच्या पत्नी सुप्रिया सुळे यांच्यात ही निवडणूक चांगलीच रंगली आहे. त्यामुळे नणंद भावजय मध्ये नेमके कोण बाजी मारणार यावरून उत्सुकता निर्माण झाली आहे.

बारामती लोकसभा निवडणूकीत सध्या तरी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात काटेकी टक्कर सुरु असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांना ४० हजार ३९८ मते आतापर्यंत मिळालेली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या सुनेत्रा पवार यांना ३१ हजार ९४७ मते आतापर्यंत मिळालेली आहेत.

दोन्ही मतांची आकडेवारी पाहता सुप्रिया सुळे यांना ८ हजार ४५१ मतांची आकडेवारी मिळालेली आहे. पहिल्या फेरीपासून सुप्रिया सुळे या आघाडीवर असून ही आघाडी कायम असल्याचे दिसून येत आहे. सुप्रिया सुळे यांना सध्या मिळालेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत टिकून राहील का याबाबत महाराष्ट्रातील जनतेमध्ये उत्सुकता आहे.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *