Breaking News

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नरेंद्र मोदी यांना दिली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ इतर मंत्रिमंडळाचे सदस्यांनी ही घेतली मंत्री पदाची शपथ

लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा विजयी झालेल्या एनडीएची सर्वात मोठी सदस्य संख्या असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी जात सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शपथ दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान पद व गोपनीयतेची शपथ दिली.

नरेंद्र मोदी यांचा शपथसोहळा पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.

मागील दोन वेळी भाजपाला एकहाती सत्ता मिळाली होती. त्यामुळे एनडीएचा अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा कोठेही उल्लेख नव्हता. मात्र यावेळी भाजपाला पुरेसा संख्याबळाचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे अखेर भाजपाला एनडीएचे सरकार म्हणून केंद्रातील सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. आझ होत असलेला शपथविधी सोहळा हा भाजपाचा नसून एनडीएचा असल्याची जाणीव भाजपाच्या जवळपास सर्वच नेत्यांना जाणीव असल्याचे जाणवत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात अनेक जूने चेहरे असल्याचे दिसून आले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *