Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जून्यासह या नव्या मंत्रांचा समावेश काही जणांना कॅबिनेट तर काही जणांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी

लोकसभेत एनडीए आघाडीला बहुमत मिळाले. त्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात जून्या मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त मंत्र्यांच्या समावेशासह काही नव्या वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्याचा समावेशही यावेळी करण्यात आला.

त्यामध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तथा शेतकरी आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेणारे मनोहर लाल खट्टर यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय गिरिराज सिग, किरण रिजूजी सारख्या अन्य मंत्र्यांचा समावेशही करण्यात आला आहे.

परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच ख्रिश्चन समाजाचे जॉर्ज कुरियन आणि पवित्रा मार्गेरेट या दोन ख्रिचन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री खालील प्रमाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर दुसरे मंत्री म्हणून राजनाथ सिंग, अमित शाह, नितीन गडकरी, जे पी नड्डा निर्मला सीतारामण, एस जयशंकर. शिवराज सिंग चौहान, मनोहरलाल खट्टर, जनता दल सेक्युलरचे एच डी कुमारस्वामी, पियुष गोयल, धर्मेद्र प्रधान, हिदूस्थान अवामी मोर्चाचे जीतनराम मांझी, जनता दलाचे युनायडेटचे राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग, सर्बानंद सोनोवाल, डॉ विरेंद्र कुमार, तेलगू देसम पार्टीचे राम मोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जूएल उराव, गिरिराज सिंग, अश्विनी वैष्णव, ज्योतीरादित्य सिंधिंया, भूपेंद्र यादव, गजेंद्रसिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरण रिजूजी, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडविया, किशन रेड्डी, चिराग पास्वान, सी आर पाटील, राव इंद्रजीत सिंग, डॉ जितेंद्र सिंग, अर्जून राम मेघवाल यांचा समावेश आहे.

राज्यमंत्री म्हणून खालील मंत्र्यांची नियुक्ती

जितेन प्रसाद, श्रीपाद केशव नाईक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर जनता दल युनायटेडचे, नित्यानंद राय, प्रतापराव गणपतराव जाधव (शिंदे गट), आरएलडीचे जयंत चौधरी २ खासदार, अपना दलच्या अनुप्रिया पटेल, व्हि सोमन्ना, टीडीपीचे डॉ चंद्रशेखर पेम्मासानी, एसपी सिंग बघेल, शोभा कांदरलांजे, किर्तीवर्धन सिंग, बीएल वर्मा, शंतनु ठाकूर, सुरेश गोपी, एल मुरूगण, अजय टम्टा, बंडी संजीवकुमार, कमलेश पास्वान, भागीरथ चौधरी, सतीशचंद्र दुबे. संजय सेठ, रमित सिंग बिट्टू, दुर्गादास उईके, रक्षा खडसे, सुखांतो मुझुमदार, सावित्री ठाकूर, तोकन साहु, राजभूषण चौधरी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा, हर्ष मल्होत्रा, निमुबेन बंबानिया, मुरलीधर मोहोळ, जॉर्ज कुरियन, पवित्रा मार्गेरेटा यांचा समावेश करण्यात आला.

https://x.com/BJP4India/status/1799799320411005260

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *