Breaking News

अभिनेते प्रकाश राज खिल्ली उडवित म्हणाले, शिकलेला नेता निवडण्यात… पेपरलिक प्रकरणावरून साधला निशाणा

मागील १० वर्षात बिहार, गुजरात, उत्तर प्रदेशात सातत्याने पेपर लिकच्या घटना घडत आलेल्या आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना या पेपर लिकचा फटका बसला आहे. त्यातच भरीस भर म्हणून की काय वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या NEET परिक्षेचा पेपरही लिक झाला. या पेपर लिकचे धागेधोरे गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यात मिळाले आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूकीत केंद्रात सत्तेत आल्यानंतर पेपरफुटी प्रकरणी नवा कायदा आणणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. मात्र सत्तेत विराजमान होऊन काही दिवस लोटत नाही. तोच NEETचा पेपर फुटला. त्यावरून विरोधकांकडून सातत्याने पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर भाजपाने लोकसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान केलेल्या व्हिडीओ जाहिरातीतील वॉर रूकवा दी पापा भंपक जाहिरातील सारांश पकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया-युक्रेन या दोन देशांमध्ये सुरु असलेले युध्द थांबवू शकतात मात्र देश पेपर लिक थांबवू शकत नाहीत असे सांगत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. एकाबाजूला नीट परिक्षेचा पेपर लिक झाल्याचे उघडकीस येत असताना देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या परिक्षेचा पेपर फुटला नसल्याचा दावा केला होता.

या सगळ्या राजकिय आरोप-टीका टीपण्यात दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी अगदी वेगळ्या अनोख्या अंदाजात जेव्हा आपण शिकलेला लोकप्रतिनिधी निवडण्यात अपयशी ठरतो असे कॅप्शन देत एक व्यंगचित्र एक्सवर ट्विट केले आहे.

या व्यंगचित्रात प्रकाश राज यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. या व्यंगचित्रात पंतप्रधान रस्ताने पेपर विकत फिरत आहेत, तर दुसऱ्याबाजूला देशभरात कोठे कोठे पेपर लिकच्या घटना घडल्या आहेत त्याचा एका नकाशा दाखविला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत