Breaking News

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, पुण्यात पब आणि हॉटेल मालकांकडून हफ्ता वसुली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन

पुणे कार अपघात प्रकरणी आरोपीला पकडल्यानंतर कारवाईला झालेल्या विलंबास पुणे पोलीस आयुक्त जबाबदार आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यात ४५० ओपन टेरेस हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलकडून त्या भागातील कोरेगाव, कल्याणनगर भागात पाच लाख रुपयांचा हप्ता वसूल केला जातो. पब नियमांचं उल्लंघन करून अनधिकृत पब सुरु आहेत. २७ पबला कुठलाही परवाना नव्हता. विना परवाना २७ पब चालत असतील तर पोलीस आयुक्त झोपा काढत होते का ? असा सवालही यावेळी केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यात ड्रग्ज माफियांनी थैमान घातले आहे. शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे त्याच पुण्यात बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याना पुण्यात पाठवावे की नाही याची पालकांना चिंता वाटते.अपघात झालेली कार विना नंबर प्लेट रस्त्यावर कशी फिरली, पोलिसांच्या हे का लक्षात आले नाही असा सवाल उपस्थित करत धनदांडग्याची कार असल्याने पोलिसांनी सोडली का असे सवाल ही यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, आरोपीला जामीन मिळाला, पोलीस निरीक्षकावर कारवाई केली गेली, यात आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला यामागे राजकीय कारण असून तेही तपासले गेले पाहिजे. दोन निष्पापांचा जीव जातो, तरुण विना परवाना गाडी चालवतो, रक्ताचे नमुने बदलण्यापर्यंत हिंमत केली जाते. ससून मधून ड्रग विकले जाते, याला कुणाचा आशीर्वाद आहे, गृहमंत्र्यानी याबाबत माहिती द्यावी अशी मागणीही यावेळी केली.

यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना विरोधी पक्षनेते यांनी दिलेली माहिती सत्य समजून त्यावर चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले.

Check Also

नव्या तीन भारतीय संहितेची अंमलबजावणी सोमवारपासूनः कायद्यातील प्रमुख बदल कोण-कोणते बदल होणार गुन्हे नोंदणीपासून ते न्यायालयीन प्रक्रियेत

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवीन फौजदारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *