Breaking News

राज्याच्या मुख्य सचिव पदाची धुरा सुजाता सौनिक यांच्याकडे प्रशासकीय इतिहासात पहिल्यांदाज महिला आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती

राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांचा कार्यकाल आणि मुदतवाढ आज संपत आली. त्यामुळे राज्याच्या प्रशासकीय मुख्य सचिव पदी ज्येष्ठ महिला सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांनी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून राज्याच्या मुख्य सचिव पदाची धुरा स्विकारली.

खरेतर आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची वर्णी यापूर्वीच राज्याच्या मुख्य सचिव पदी लागणे सेवा ज्येष्ठता यादीनुसार अपेक्षित होते. परंतु त्यावेळी त्यांचे पती मनोज सौनिक यांची वर्णी राज्याच्या मुख्य सचिव पदावर लागली. त्यानंतर महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांची वर्णी लागली. नितीन करीर यांचा कालावधी वास्तविक पाहता ३० मार्च रोजीच संपुष्टात आला होता. मात्र त्यावेळी लोकसभा निवडणूकांची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिव पदावरील व्यक्तीवर नव्या व्यक्तीची नियुक्ती करणे शक्य नव्हते. त्यामुळे नितीन करीर यांच्याकडे या पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली.

सध्या सुजाता सौनिक यांच्याकडे गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदाची जबाबदारी होती. मात्र आता त्यांची वर्णी राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याकडील गृह विभागाचा पदभार त्याच्याकडेच राहणार की नव्या अप्पर मुख्य सचिवाकडे हस्तांतरीत होणार हे लवकरच कळणार आहे. मात्र राज्याच्या इतिहासात पती-पत्नी राज्याच्या मुख्य सचिव पदावर आलेले सुजाता -मनोज सौनिक यांच्या निमित्ताने पहिल्यादाच घडत आहे. याशिवाय देशात उद्यापासून अर्थात सोमवारपासून नव्या भारतीय न्याय संहितेची अंमलबजावणी होत असताना सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी होत आहे. त्यामुळे सुजाता सौनिक यांची नियुक्ती लक्षात राहणारी आहे.

Check Also

शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत कपिल पाटील यांची घणाघाती टीका

शिक्षण सेवक आणि कंत्राटीपद्धत आणून शिक्षकांचे नुकसान करणारे आणि आदर्श सोसायटीत कारगिल शहीदांचे फ्लॅट हडपणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *