Breaking News

Hit And Run worli: मिहिर शहाला पोलिस कोठडी, तर राजेश शहाची उपनेतेपदावरून हकालपट्टी शिवसेना शिंदे गटाचा निर्णयः मिहिर ६० तासानंतर पोलिसांच्या ताब्यात

भल्या पहाटे आपल्या रोजगाराच्या निमित्ताने मुंबईतील वरळीतील आपल्या घराकडे विक्रीसाठी बाहेर पडलेल्या नाकाव कुटुंबियांच्या दुचाकीला शिवसेना शिंदे गटाच्या उपनेते राहिलेल्या राजेश शहा याच्या मुलाने मिहिर शहाने धडक दिली. तसेच अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर तिसऱ्या दिवशी अर्थात काल संध्याकाळी अखेर मिहिर शहाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आज दुपारी शिंदे गटाचे उपनेते असलेले राजेश शहा यास आज सकाळी उपनेते पदावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हकालपट्टी केली.

दरम्यान पोलिसांनी मिहिर शहा याला न्यायालयात आज हजर केले असताना न्यायालयाने मिहिरला १६ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पुढे आली. तर दुसऱ्याबाजूला मिहिर शहा ज्या बार मध्ये बसून मद्यप्राशन केले त्या बारवर महापालिकेने कारवाई करत त्या बारवर बुलडोझरने कारवाई करत बार पाडले.

शिवसेना सचिव संजय मोरे यांनी एका ओळीच्या नोटीसमध्ये राजेश शहा यांना पक्षाच्या उपनेतेपदावरून मुक्त करण्यात आले आहे. शहा हे मात्र शिवसेनेचे सदस्य आहेत.

“७ जुलै रोजी दक्षिण-मध्य मुंबईतील वरळी परिसरात मिहीर शाहने चालविलेल्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली, परिणामी कावेरी नाखवा (४५) हिचा मृत्यू झाला, तर तिचा पती जखमी झाला मात्र थोडक्यात प्रदीप बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहिर शहा याने धडक दिल्यानंतर कावेरी नाखवाला भरधाव वेगाने सुमारे १.५ किलोमीटर खेचले, त्यानंतर ड्रायव्हरसोबत सीट बदलली आणि दुसऱ्या वाहनात पळून गेला. बीएमडब्ल्यू पलटी करताना चालकाने तिच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप आहे. मिहीर शाहला ९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती.

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणातील मुख्य आरोपीने अपघातात सहभागी असलेल्या कारचा ताबा हाती घेण्यापूर्वी काही तास आधी भेट दिलेल्या मुंबईतील जूहू येथील व्हाइस-ग्लोबल तापस बार मद्यप्राशन केले होते. या बारच्या केलेले अनधिकृत फेरबदल पाडण्याची कारावाई केल्याची माहिती अधिकाऱ्यांने दिली.

महापालिकेने मंगळवारी बारची पाहणी केली होती की तेथे अनधिकृत वाढ आणि फेरफार केले गेले आहेत का. “तपासणीदरम्यान बारमध्ये तपशीलवार मोजमाप घेण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. पाडण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी बारला नोटीस देण्यात आली होती, असेही यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने या बारला सील ठोकले. शनिवारी रात्री मिहीर शाह आणि त्याच्या मित्रांनी याला भेट दिली, मिहिर शहाचे वय २४ असून २५ वर्षाखालील असल्याने नियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदर बार सील केल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाने दिली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *