Breaking News

ठाणे खाडी परिसरात आढळली गरुडासारखी दिसणारी ब्राह्मणी घार दक्षीण भारतातून शेकडो मैलाचा प्रवास करत भक्ष्य शोधण्यासाठी घरीच्या घिरट्या

ठाणे खाडीत फ्लेमिंगो पक्ष्यांना बघण्याची नजाकत काही वेगळी असताना, गरुडासारखी चालाख आणि घारीसारखा दिसणाऱ्या ब्राम्हणी घार (Brahminy Kite ) पक्षीप्रमींचे लक्ष वेधत आहे. समुद्र-खाडीतील माश्यांबरोबर नदी तलावातील माश्यांचा फडशा पाडण्यासाठी ब्राम्हणी घार दक्षिण भारतातून येत असून सावजाला (माशाला) पकडण्यासाठी पाण्यावर झेपावताना बघण्याची वेगळी संधी ठाणेकराना मिळत आहे.

हिवाळ्यात ठाणे खाडीच्या दिशेने अनेक स्थलांतरीत पक्षी झेपावत असले तरी पावसाळ्यात ब्राम्हणी घार खाडीवर घिरट्या घालताना दिसून येतात. सर्वसाधारण घारीसारखी ही घार दिसत असली तरी ब्राम्हणीघार आकाराने लहान आहे. पावसाळा सुरू झाला की ही ब्राम्हणी घार केरळ-गोवा राज्यातून कोकणाच्या दिशेने येते. शरीराचा रंग तांबूस तर डोक आणि मानेचा रंग पांढ-या रंगाचा आहे.तर आपल्या काळ्या घारींची शेपटी दुभंगलेली असून ब्राम्हणी घारीची शेपटी ही गोलाकार आहे. वेळी खारफूटीच्या जंगलात झाडाच्या शेंड्यावर बसलेली दिसून येते असल्याची माहिती पक्षी अभ्यासक हिमांशू टेंभेकर यांनी दिली.

खाडीवर भक्ष्याच्या शोधात स्थानिक घारी घिरट्या मारताना आढळतात, त्यामुळे ही ब्राम्हणीघार खाडीवर विहार करताना पटकन समजून येत नाही. खाडीमधील माशाला पकडण्यासाठी त्या पाण्यावर झेपावतात, त्याचवेळी त्यांना बघण्याची संधी पक्षीप्रेमींना मिळते. गरुडा सारखीच तीक्ष्ण नजर असणारी ही घार सावजाला पापणी लवते ना लवतेच तो शिकार करते. मासे हे त्यांचे सर्वात आवडते खाद्य असून समुद्र अथवा नदीकाठी देखील या घारींचा वावर असतो. डिसेंबर ते जानेवारी हा या घारींचा विणीचा हंगाम असून पावसाळ्यात दिसणा-या या घारी सप्टेंबर नंतर दक्षीण भारतात माघारी जात असल्याचे पक्षी अभ्यासक मंदार बापट म्हणाले.

ठाणे खाडीमध्ये कारखान्यातून सोडले जाणारे रासायनिक द्रव्य, शहरातील सांडपाणी आदी घटकांमुळे खाडीतील पाणी प्रदुषित झाले आहे. खाडीत आक्सिजनची मात्राच नसल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे खाडीत मासे, खेकडे, कोळंबी सारखे जलचर नोमशेष होण्याच्या मार्गावर आहेत, परंतु महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करुन खाडीत सोडलेल्या पाणठळ जागेत जलचरांची साखळी वाढली आहे. याच ठिकाणी या ब्राम्हणीघारी माश्यांचा फडशा मारण्यासाठी घिरट्या मारत आहेत

मंदार बापट ( पक्षी अभ्यासक ठाणे)

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *