Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, शासकिय केंद्रावर भरले जाणारे अर्जच ग्राह्य पैसे मागणाऱ्याला तुरुंगात पाठवा

नुकतेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना जाहिर केल्यानंतर राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी लाडका भाऊ योजना जाहिर केली. तसेच महिलांप्रमाणे राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी महिना ६ हजार, ८ हजार आणि १० हजार रूपयांचे मासिक भत्ता देण्याची घोषणा केली. मात्र लाडकी बहिण योजनेसाठी भरण्यात येणाऱ्या अर्जासाठी काही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त पैशांची मागणी करण्यात येत असल्याची माहिती पुढे येऊ लागली. या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजनेसाठी शासकिय केंद्रावर भरण्यात आलेले अर्जच ग्राह्य धरले असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नोंदणी करताना कुठेही महिला-भगिनींची अडवणूक होता कामा नये. महिला भगिनींकडून अर्जासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. अशांना केवळ निलंबित करून नका, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला तुरुंगात पाठवा. या योजनेत भगिनींना कुणीही नाडता काम नये याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. या नोंदणीचा सातत्याने आढावा घेतला जाणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, केवळ शासकीय केंद्रावर भरले जाणारे अर्जच पडताळणीसाठी ग्राह्य धरले जातील अशा सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले. महिला भगिनींचे आधार आणि बँक खात्यांची माहिती काळजीपूर्वक भरली जाईल याकडे लक्ष देण्यात यावे असे निर्देशही यावेळी दिले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *