Breaking News

हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने पुणेनंतर आता मुंबईतही सुट्टी जाहिर मुंबई महापालिकेकडून सुट्टी जाहिर

राज्यातील पुणे, ठाणे आणि मुंबई व उपनगराला हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जाहिर केला आहे. यापार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने यापूर्वीच तेथील शाळा, कॉलेजला सुट्टी झाली केली होती. त्यापाठोपाठ मुंबईतही या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आज सुट्टी जाहिर केली आहे. तर उद्या पावसाची परिस्थितीपाहून सुट्टी जाहिर करणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

आज पहाटेपासून मुंबईसह उपनगर, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, पालघर, वसई-विरार भागात मुसळधार पावसाने सुरुवात केली. विशेष म्हणजे पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तर सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दृष्य पाह्यला मिळाले. त्यातच दुपारनंतर हवामान खात्याने आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला. त्यामुळे शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी सुखरूपपणे घरी पोहोचावे यासाठी मुंबई महापालिकेकडून सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

उद्या शुक्रवारी पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर कदाचीत उद्याही मुंबई महापालिकेकडून सुट्टी जाहिर केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *