Breaking News

मराठी भाषेला गौरवशाली अभिजात भाषेचा दर्जा …! मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्याच्या अस्मितेचा प्रश्न

मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे, या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्रातील मराठी जनमाणसाची भावना, मागणी आहे, ही मागणी गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्रातील जनतेची मागणी पूर्ण करावी, अशी निवेदनाद्वारे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खा. रविंद्र वायकर यांनी केलेली मागणी शुक्रवारी लोकसभेत पटलावर ठेवण्यात आली.

लोकसभा नियमावली ३७७ नुसार हा विषय मांडला होता. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात मराठी भाषा केवळ बोलली जात नसून तिचे वाचन, लिखाण, याबद्दल संशोधन केले जाते. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेला गौरवशाली व ऐतीहासिक परंपरा आहे. पौराणिक काळापासून उत्तम दर्जाचे साहित्य मराठी भाषेत मुबलक प्रमाणत उपलब्ध आहे.

१२७८ साली माहीमभट यांनी लीळाचारीत्र लिहिले. १९२० साली संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहली, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी साम्राज्यांची मुहूर्तमेढ रोवली. इ.स १०१२, १०६०, ११३० अशा अनेक वर्षापासून मराठी भाषांचे पुरातन साहित्य, पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहे.

२७ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाने वेगवेगळ्या राज्यातील स्थानिक ६ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, अशी माहिती वायकर यांनी लोकसभेत दिली.

मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी सर्व मापदंड पूर्ण करत असतानाही मराठी भाषेला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा न दिल्याने वायकर यांनी सांस्कृतिक मंत्री यांचे लक्ष वेधले . मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्यांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांनी यात लक्ष घालून मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी वायकर यांनी निवेदनाद्वारे केलेली मागाणी लोकसभेच्या पाटलावर ठेवण्यात आली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत