Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप…भीतीपोटी योजनेवर उद्धव ठाकरेंची टीका महिला मोर्चातर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना २५ लाख राख्या पाठविणार

महायुती सरकरच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळणारी प्रचंड लोकप्रियता पाहून उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच ते या योजनेवर टीका करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला.

भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, संजय केनेकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी यावेळी उपस्थित होते. या योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला मोर्चा तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील २५ लाख महिला रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या पाठवणार असल्याची माहितीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी योजना ही कायमस्वरुपी योजना असून महिलांनी या १८,००० रुपयांमधील किमान ३ हजार रुपयांचा विमा जरी उतरवला तरी त्यांच्या संपूर्ण परिवाराला सुरक्षा कवच मिळू शकेल इतकी ताकद या योजनेत असल्याचे नमूद करत लाडकी बहीण योजनेबद्दल अपप्रचार करत उद्धव ठाकरे यांनी महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत करोडपतींच्या घरात जन्माला आलेल्यांना या योजनेचे मोल कळणारच नाही असा उपरोधिक टोला लगावत महिला वर्गासाठी उपयुक्त योजनेची खिल्ली उडवून उद्धव ठाकरे यांनी आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिल्याची टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुती सरकारतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आत्मसन्मान देण्यासाठी प्रति महिना १५०० रुपये म्हणजेच वर्षाला १८,००० रुपये खात्यात जमा करणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानत म्हणाले की, काँग्रेस आणि सहका-यांचे सरकार असलेल्या कर्नाटक, हिमाचल प्रदेश मध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गृहलक्ष्मी योजनेचे आश्वासन देऊन मते घेतली आणि सत्ता आल्यानंतर योजना बंद केली. जनतेशी अशी लबाडी करणा-यांना लाडकी बहीण योजनेवर टीका करण्याचा अधिकारच नाही. लबाड पार्टीसोबत असलेल्या उद्धव ठाकरेंना या योजनेत पण लबाडीच दिसते यात काही नवल नाही असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले की, मध्य प्रदेश सरकारचे उदाहरण देत, भाजपा आणि सहका-यांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मतपेढी वर लक्ष ठेवून योजना घोषित न करता कायमस्वरुपी योजना राबवल्या जातात. कर्नाटक आणि मध्य प्रदेश या दोन राज्य सरकारांमधील फरक मांडत येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात जनता भरभरून मते देईल असा विश्वासही यावेळी बोलून दाखवला. ४२ लाख शेतकऱयांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णयाबद्दलही महायुती सरकारचे अभिनंदन भाजपा तर्फे   केले.

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *