Breaking News

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरयाणा व जम्मू आणि काश्मीरचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झारखंड आणि महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम एकत्रित जाहिर करण्याची शक्यता

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीनंतर चार राज्यातील विधानसभा निवडणूका एकदमच होतील अशी अटकळ बांधली जात असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी हरयाणा व जम्मू काश्मीर राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज जाहिर केला.

मागील काही वर्षापासून जम्मू आणि काश्मीर राज्याची विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. मध्यंतरी लोकसभा निवडणूकीसोबतच आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणूकांप्रमाणेच जम्मू आणि काश्मीरमध्येही निवडणूका होतील अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत जम्मू आणि काश्मीरच्या निवडणूका स्वतंत्र घेणार असल्याचे त्यावेळी जाहिर केले होते.

त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज जाहिर केला. त्यानुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये ९० विधानसभा मतदारसंघात ३ टप्प्यात निवडणूका होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी २० ऑगस्ट रोजी नोटीफिकेशन जारी होणार होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट पर्यंत राहणार आहे. तर उमेदवारी अर्जाची छाणणी २८ ऑगस्ट रोजी आणि अर्ज मागे घेण्याची तारीख ३० ऑगस्ट रोजी आहे. तर मतदान १८ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबर रोजी मतदान तर तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर मतमोजणी ४ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहिर करण्यात येणार आहेत.

यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हरयाणा राज्यातील ९० विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया ५ सप्टेंबर रोजी पासून होणार या राज्यातील मतदान १ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार होणार आहे. विशेष म्हणजे हरयाणामध्ये एकाच टप्प्यात ९० जागांसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी आणि निकाल ४ नोव्हेंबर रोजी जाहिर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

तर २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपणार असून झारखंड राज्याच्या विधानसभेची ५ जानेवारी २०२४ रोजी मुदत संपणार आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांची निवडणूक या दोन राज्यांच्या निवडणूकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहिर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी जम्मू आणि काश्मीर, हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या चारही राज्यांच्या विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया एकत्रित घेण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र आज अचानक महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांना वगळून जम्मू आणि काश्मीर, हरयाणा या दोन राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहिर केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत