Breaking News

रामदास आठवले यांची मागणी,… बदलापुरकरांवरील गुन्हे रद्द करा पुरुष मदतनीस ठेवणे चुकीचे

बदलापूर मधील अत्यंत लहानग्या मुलींवरील अत्याचाराची घटना महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आहे.मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ उत्स्फूर्त आंदोलन करणाऱ्या बदलापूरवासियांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत. बदलापूर मधील त्या आंदोलकांना अटक करू नये अशी आपली मागणी असून त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

बदलापूर प्रकरणातील पीडित लहानग्या मुलींच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी विशेष सहाय्य म्हणून आर्थिक मदत दिली पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी करणार आहोत असे रामदास आठवले यांनी सांगितले.

आज बदलापूर ला भेट देऊन येथील नगरपरिषद कार्यालयात बदलापूर प्रकरणाबाबत सर्व पोलीस आणि प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक रामदास आठवले यांनी घेतली. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ सुधाकर पठारे; तहसीलदार अमित पुरी; बदलापूर नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती गायकवाड आदी अधिकारी पोलीस प्रशासन अधिकारी उपस्थित होते.

बदलापूर मधील आदर्श विद्यालयात ही दुर्घटना घडली त्या शाळेचे व्यवस्थापन बरखास्त करण्यात आले असून प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी ला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात येणार असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार ने गांभीर्याने दखल घेतली आहे. आरोपीला फाशीची कठोर शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.

रामदास आठवले म्हणाले की, विरोधी पक्षाने या प्रकरणी राजकारण करू नये. हे अत्यंत निषेधार्ह मानवतेला काळीमा फासणारे प्रकरण आहे. उज्ज्वल निकम हे अनुभवी वकील असल्यानेच त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणी नियुक्ती केली आहे. आरोपी शिंदे हा मूळ गुलबर्गा कर्नाटकचा रहिवासी असून १ ऑगस्ट पासून तो कामावर आला होता. लहान मुलींच्या सांभाळासाठी महिला सेवकच शाळेत नियुक्त केले पाहिजेत त्यासाठी पुरुष मदतनीस ठेवणे अत्यंत चुकीचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत