Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाप्रकरणी नौदलाची चौकशी समिती संयुक्त तांत्रिक समिती केंद्रीय संरक्षण विभागाकडून नियुक्त

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ यांचा समावेश असलेली एक संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त करण्यासंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.

मराठा नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी संरक्षण आणि सुरक्षेच्या वारशाचा गौरव करण्याच्या उद्देशाने, तसेच आधुनिक भारतीय नौदलासमवेतचा ऐतिहासिक दुवा अधोरेखित करण्यासाठी सिंधुदुर्गात प्रथमच आयोजित नौदल दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून ०४ डिसेंबर २०२३ रोजी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. या प्रकल्पाची संकल्पना भारतीय नौदलाने तयार केली होती आणि राज्य सरकारच्या समन्वयाने त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता. आता शिवरायांचा पुतळा लवकर पुनर्स्थापित करण्यासाठी सर्व उपायांमध्ये मदत करण्यासाठी भारतीय नौदल कटीबद्ध आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Check Also

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या विविध योजनांसाठी १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करा १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सुविधा कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, शैक्षणिक कर्ज योजना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *