Breaking News

पंतप्रधान मोदी यांची शिवाजी महाराजांची माफी मागतानाही राहुल गांधींवर टीका स्वातंत्रवीर वि.दा. सावरकर यांच्या अवमानाचा शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची तुलना

शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून दैवतासमोर अनेकवेळा झुकले तरी आम्हाला त्याचे वावगे नाही. सिंधूदुर्गात मागील काही दिवसात जी घटना घडली. त्या घटनेबद्दल मनात खेद आहे. तसेच या घटनेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांची पायाशी डोकं ठेवत त्यांची माफी मागत असल्याचे सांगत काहीजण स्वातंत्रवीर वि दा सावरकर यांचा अवमान करतात परंतु त्या बद्दल माफी मागायला तयार नाहीत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराज यांची माफी मागताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शिवाजी महाराज यांची माफी मागितली. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, ते आमचे देव आहेत. त्यामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील घटनेबाबत मला दुःख आहे. त्यामुळे त्यांच्या पायाशी झुकून मी माफी मागतो. माझी शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्यांनाही विनंती आहे की, या झाल्या घटनेबद्दल मी त्यांचीही माफी मागतो असेही यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात असेही काहीजण आहेत, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. त्यांच्यावरही टीका करतात, त्यांचा अपमान करतात. ते लोक न्यायालयात जाऊन न्यायिक लढाई लढतात पण स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेची माफीही मागत नाहीत. मात्र आमच्यावर संस्कारच वेगळे आहेत. त्यामुळे देशाच्या आदर्श व्यक्तींसमोर आम्हाला माफी मागायला संकोच वाटत नाही, पण कदाचित त्यांच्यावर संस्कार झाले नसतील म्हणून ते भारतमातेच्या सुपुत्रावर केलेल्या टीकेची माफीही मागत नाहीत अशी उपरोधिक टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता केली.

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *