Breaking News

प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती,… न्यायालयात प्रकरण हाताळण्यास वकिलांना मदत… एससी एसटी क्रिमीलेयर आणि उपवर्गीकरणावर पुनर्विचार याचिका दाखल करणार

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई यांच्या अनुसूचित जाती (SC) मध्ये क्रिमी लेयर आणि उप-वर्गीकरणाला परवानगी देणाऱ्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रतीक बोंबार्डे यांच्यामार्फत आज पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर ट्विट करत माहिती दिली.

या संदर्भात बोलताना ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, यावेळी पुनर्विचार याचिकेतील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मी हे प्रकरण न्यायालयात हाताळण्यास वकिलांना मदत करीन असेही यावेळी सांगितले.

अनुसूचित जाती (SC)मध्ये क्रिमी लेयर आणि उप-वर्गीकरणाला देशभरातील एससी एसटी समाज विरोध करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट रोजी विविध दलित – आदिवासी संघटनांनी भारत बंद ची घोषणा केली होती. वंचित बहुजन आघाडीने सुद्धा भारत बंद ला पाठिंबा दिला होता.

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *