Breaking News

आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांकडून स्विकारणार राज्य सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून शासन निर्णय जारी

आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील महिला वर्गाला (मतदारांना) आकर्षित कऱण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहिर केली. तसेच योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला १५०० रूपये देण्याचा निर्णयही जाहिर केला. या योजनेच्या लाभार्थ्यांना दोन-तीन महिन्याचे हप्तेही देण्यात आले. मात्र यापूर्वी राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून या योजनेसाठी अर्ज घेण्यात येत होते. मात्र ते अर्ज फारच मर्यादीत येत असल्याने अखेर या योजनेसाठी महिलांकडून अर्ज दाखल करून घेण्यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांची निवड केली असून माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांकडून दाखल करून घेण्यात येणार असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

माझी लाडकी बहिण योजनेतंर्गत यापूर्वी महिला व बाल कल्याण विभागाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज भरून घेतले जात असत. मात्र संकेतस्थळाचा अर्थात डिजीटल इंडियाचे फायदे राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत अद्याप पोहोचले नाहीत. तसेच अर्जदार लाभार्थ्यांची संख्याही मर्यादीत होत आहे. यापार्श्वभूमीवर महिला लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी आता या योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फत स्विकारण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

शहरे, तालुके-ग्रामीण भागातील अगदी गल्लीबोळात अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. त्यामुळे या अंगणवाडी सेविकांच्या मार्फत महिला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या मार्फत अर्ज दाखल करून घेणे सोयीचे होणार आहे. नुकतेच पुणे येथील एका व्यक्तीने एकाच महिलेच्या नावाने पण विविध आधारकार्डाच्या नंबरच्या आधारे माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरले. तसेच त्याचा लाभ घेतल्याचा प्रकारही यावेळी उघडकीस आला. त्यामुळे योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय खालील प्रमाणे

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *