Breaking News

विनेश फोगट, बजरंग पुनियांचा काँग्रेस प्रवेश होताच बृजभूषण सरण सिंग यांची टीका महिला कुस्तीगीरांचे आंदोलन काँग्रेस पुरुस्कृत

काही महिन्यांपूर्वी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एकाबाजूला नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन होत असताना दुसऱ्याबाजूला भाजपा खासदार बृजभूषण सरण सिंग यांने महिला कुस्ती पटूंचे लैगिंक शोषण केल्याच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन सुरु केले होते. अखेर दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही बृजभूषण सरण सिंग यांच्या विरोधात कारवाई करण्याचे धारिष्ट काही झाले नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भाजपा खासदार बृजभूषण सरण सिंग याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर या प्रकरणातील चौकशीला सुरुवात झाली.

बृजभूषण सरण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिला कुस्ती पटू साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी आंदोलन केले. तसेच हे आंदोलन पुढेही सुरु राहणार असल्याची घोषणा या तिघांनी वेळोवेळी केली. दरम्यान विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी पॅरिसमधील ऑलिपिंक स्पर्धेत भाग घेतला. विनेश फोगाट अंतिम सामन्यापर्यंतही पोहोचली. मात्र अंतिम सामन्यावेळी वजन तिचे जास्त भरत असल्याचे सांगत तिला अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर विनेश फोगट भारतात परतल्यानंतर तीच्याबरोबर बजरंग पुनिया याने काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोघांचा पक्ष प्रवेशही पार पडला.

या पक्षप्रवेशावरून भाजपाचे माजी खासदार बृजभूषण सिंग यांनी महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर टीका करत या हे आंदोलन काँग्रेस पुरस्कृत असल्याचा आरोप केला.

तसेच पुढे बोलताना बृजभूषण सरण सिंग म्हणाले की, विनेश-बजरंगने वास्तविक पाहता मुलींच्या सन्मानासाठी आंदोलन केले नव्हते. विनेश बजरंगच्या काँग्रेस प्रवेशानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की, काँग्रेसने माझ्या विरोधात षडयंत्र रचलं होतं. मला हरियाणाच्या जनतेला सांगायचय की, त्यांनी त्यांच्या आणि काँग्रेसच्या राजकारणासाठी आंदोलन केलं. आपल्या लेकींचा वापर काँग्रेसने केल्याचा आरोप करत ते केवळ मुलींच्या सन्मानासाठी नव्हे तर राजकारणासाठी आंदोलन करत होत्या अशी टीकाही यावेळी केली.

बृजभूषण सरण सिंग पुढे बोलताना म्हणाले की, मी आपल्या लेकींचा कधी अपमान केला नाही, महिला कुस्तीपटूंचा अपमान कोणी केला असेल तर विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाने केला. या लोकांनीच मुलींना अपमानित केल्याचे सांगत हरियाणाचे काँग्रेस नेते भूपिंदर हुड्डा यांनी हा कट शिजवला होता. भाजपाने मला विनेश आणि बजरंगच्या विरोधात प्रचार करण्याचा आदेश दिले तर मी हरयाणात जावून प्रचार करणार असल्याचे स्पष्ट करत काँग्रेसने जे काही केलंय त्याचा पश्चाताप काँग्रेसला झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी दिला.

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *