Breaking News

प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, भाजपा – काँग्रेसच्या तालावर आदिवासी नाचणार नाही दलित, आदिवासी आणि ओबीसी यांची युती परिवर्तन घडवेल

आदिवासी भाजपा आणि काँग्रेसच्या तालावर नाचणार नाहीत. आदिवासींना समान हक्क आणि सामाजिक न्याय नाकारला गेला आहे आणि त्यांचे जल, जंगल, जमिन भाजपा आणि काँग्रेसच्या एकापाठोपाठ आलेल्या सरकारांनी लुटले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत केला.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आदिवासींच्या वनजमिनी बाहेरच्या लोकांनी अतिक्रमण करून नष्ट करण्याचा ब्रिटिशांचा वारसा भाजपा आणि काँग्रेसने सुरू ठेवला आहे. दोघांनीही आदिवासी नेत्यांचा सहभाग केवळ राखीव मतदारसंघांपुरताच मर्यादित केला. त्यांना भाजपा आणि काँग्रेसने बदनाम केले आहे आणि संरक्षण दिले आहे. आता आणखी असे नको असा इशाराही यावेळी दिला.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रातील आदिवासींचे प्रतिनिधी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय दोन्ही हक्कांसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत एकत्र आल्याचेही यावेळी सांगत वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणुकीत बिगर आरक्षित मतदारसंघांवर आदिवासींना प्रतिनिधित्व देणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

शेवटी आपल्या एक्सवरील प्रोफाईलवर ट्विट करत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आगामी काळात दलित, आदिवासी आणि ओबीसींची सामाजिक आणि राजकीय युती महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत