Breaking News

धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

राज्यात मुळ पक्षातून फुटून मुळ पक्षच पळविण्याची प्रथा महाराष्ट्रात सुरु झाली आहे. या प्रथेचे पालन आता आमदारांच्या घरातही सुरु झाले असून त्याचाच एक भाग असलेल्या अजित पवार गटाचे आमदार तथा राज्याचे मंत्री धर्मराव बाब आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी वडीलांनी घेतलेला निर्णय पटला नाही. त्यामुळे शरदचंद्र पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहिर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत आज प्रवेश केला.

यावेळी भाग्यश्री आत्राम यांच्या पक्ष प्रवेशानिमित्त आयोजित कार्यक्रमात जयंत पाटील बोलताना म्हणाले की, मध्यंतरी धर्मराव बाब आत्राम यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. ते गेले. परंतु धर्मरावबाब आत्राम यांनी घेतलेला निर्णय आपल्याला मुळीच आवडलेला नाही असे सातत्याने भाग्यश्री आत्राम यांनी त्यांच्या वडीलांना सांगितला. तसेच आपण परत मुळ पक्षात जाऊ असेही त्या सांगत होत्या. त्यामुळे अखेर भाग्यश्री आत्राम या आमच्याकडे सातत्याने येत होत्या, तसेच वडीलांचा निर्णय मान्य नसल्याचे सांगत होत्या. त्यामुळे वडीलांची काही ही भूमिका असली तरी मी मुळ पक्षासोबतच राहणार असल्याची भूमिका त्या मांडत राहिल्या. त्यामुळे त्यांना पक्षात प्रवेश देण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाल्या की, जरी तुम्हाला वडीलांनी अंतर दिलेले असले तरी हा पक्ष कधी अंतर देणार नाही असेही यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना धर्मराव बाब आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम म्हणाल्या की, वडीलांनी घेतलेली भूमिका मला आवडली नाही. त्यामुळे त्यांना मुळ पक्षात परत जाण्याबाबत सातत्याने सांगत होते. शेवटी मी त्यांना निक्षून सांगितले की, एक तर पुन्हा मूळ पक्षात परत जाऊ अन्यथा मी तुम्हाला सोडून शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे वडीलांच्या मुळ भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेण्यास भाग पडले असेही यांवेळी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत