Breaking News

काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा सवाल, पंतप्रधान कुठे उभे गांधी, की नथुरामच्या बाजूने या तीन प्रश्नांची उत्तरे द्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भातील महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येणार असल्याने काँग्रेसने शुक्रवारी त्यांना महात्मा गांधी आणि हिंदूत्ववादी संघटनेचे सदस्य राहिलेले आणि गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी करत पंतप्रधान मोदी नेमके गांधींच्या बाजूने की नथुराम गो़डसे यांच्यात नेमके कोठे उभे आहेत असा सवालही यावेळी केली.

नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान आज वर्ध्याला जात आहेत. त्यामुळे नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान मोदी यांनी तीन प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असे आवाहन जयराम रमेश यांनी करत: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी भाजपा काय करत आहे? वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत भाजपाने आदिवासींना डावलले का? गांधी आणि गोडसे यांच्यात पंतप्रधान कुठे उभे आहेत?’ असा सवाल यावेळी केला.

जयराम रमेश यांनी एक्स वर ट्विट करत म्हणाले की, ‘वर्धा हे शहर जिथे एकेकाळी महात्मा गांधी राहत होते. महात्माजींच्या आदर्शांवर आज पंतप्रधानांच्याच पक्षाकडून एकत्रित हल्ले होत आहेत. त्यांच्या काही नेत्यांनी महात्माजींना शिवीगाळ आणि विटंबना केली, आणि इतरांनी म्हटले आहे की ते गोडसे आणि गांधी यांच्यातील निवड करू शकत नाहीत. देशभरातील गांधीवादी संस्था – वाराणसीतील अखिल भारत सर्व सेवा संघ ते गुजरातमधील साबरमती आश्रमापर्यंत – आरएसएस RSS आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी उद्ध्वस्त केल्या आणि ताब्यात घेतल्या, असल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले की, ‘वाराणसीतील सर्व सेवा संघाचे सहयोगी सध्या १०० दिवसांपासून उपोषण करत आहेत. आणि सरकारच्या या पवित्र संस्थेच्या उधळपट्टीच्या निषेधार्थ. नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांकडे त्यांच्या पक्षाच्या कृतींचा काही बचाव आहे का? गांधी आणि गोडसे यांच्यात निवड करण्यात ते कुठे उभे आहेत ?’ असा सवालही यावेळी केला.

विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबतही काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विचारणा करत म्हणाले की, ‘महाराष्ट्रात सरासरी दिवसाला सात शेतकरी स्वतःचा जीव देतात. ही हृदयद्रावक आकडेवारी राज्याच्या मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांकडून आली आहे, ज्यांनी गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान २,३६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद केली आहे. कारणे स्पष्ट आहेत: गेल्या वर्षी ६०% जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती होती, परंतु सरकारकडून कोणतीही मदत पोहोचवली नाही,’ असा आरोपही यावेळी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत