Breaking News

प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा, रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य एनडीएत प्रकाश आंबेडकरांनी सहभागी होण्याचे आवाहन

रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचे अनेकदा प्रयत्न झाले. मात्र रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य काही होऊ शकले नाही. मात्र केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निवडणूकीच्या कालावधीत नेहमीच प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यासोबत भाजपाबरोबर किंवा काँग्रेस आघाडीत सहभागी व्हावे म्हणून आवाहन करत राहिले. मात्र यावेळी रामदास आठवले यांनी एनडीएत प्रकाश आंबेडकरांनी सहभागी व्हावे आणि त्यांना मंत्री पदा द्यावे अशी मागणी केली. मात्र ही मागणी करताना प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी प्रसंगी मंत्री पद सोडण्याची तयारीही दाखविली.

यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने थोडासा सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे. त्यांना माझं एनडीएत येण्याच निमंत्रण असून महायुतीत ते आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल असे सांगत ते जर आले तर मला मंत्री नाही केलं तर चालेल पण प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा अशी मागणीही यावेळी केली.

यावेळी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अनेक नेते शरद पवार यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबत विचारले असता रामदास आठवले म्हणाले की, ज्यांना तिकिट मिळायची खात्री नाही, ते शरद पवार यांच्याकडे जात आहेत. आम्ही त्यांचा बारकाईने अभ्यास करत असल्याचेही यावेळी सांगितले.

वन नेशन वन इलेक्शनबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, पूर्वी वन नेशन वन इलेक्शन अशी प्रणाली होती. संविधानात तशी तरतूद होती सुरुवातीला काही निवडणूका अशाच झाल्या. त्यामुळे देशाचा फायदा होणार आहे. हा काही हुकूमशाही आणण्याचा विषय नाही. त्यामुळे या विधेयकाला माझा पाठिंबा असल्याचेही यावेळी स्पष्टपणे सांगितले.

याशिवाय रामदास आठवले म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूकीत महायुतीकडे १८ जागा मागणार आहे. तसेच आमच्या १०-१२ जागा मिळाल्यानंतर १-२ मंत्रीपदे मिळावीत महामंडळ मिळावीत अशी अपेक्षा असल्याचे सांगत विधानसभा निवडणूकीत रिपाईला विसरू नये आम्हाला जावलू नये यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला भाजपाच्या कोट्यातील समजू नये तिघांनी मिळून जागा द्याव्यात अशी मागमी करत यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत