Breaking News

आदित्य ठाकरे यांचा सवाल, पंतप्रधानांचा दौरा रद्द, पण सामान्यांना झालेल्या त्रासाचं काय ? स्टॅच्यु ऑफ युनिटी पक्की बांधली, मग महाराजांचा पुतळा का कमकुवत बनवला ?

मुंबई पुण्यात मुसळधार पाऊस होऊन त्यात सर्वसामान्यांचे हाल झाले. यावरून सरकारला आदित्य ठाकरे यांनी धारेवर धरत ‘काल काही मिनिटांच्या पावसात मुंबई पुणे ठाणे परिसरातील लोकांचे हाल झाले. अर्ध्या एक तासाच्या पावसात मुंबई ठप्प झाली. काल पश्चिम वेस्टर्न एक्सप्रेस हायवे देखील ठप्प झाला, रेल्वे ठप्प झाल्या असे सांगत कुठे होते मुख्यमंत्री आणि पालकमंत्री असा सवाल आदित्य ठाकरे यांनी आज केला.

मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत पावसावरून शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

यावरून टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि पालकमंत्री कुठे होते ? मुख्यमंत्री मुंबई खड्डेमुक्त करणार होते. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेत पण अर्धा किलोमीटर काम पूर्ण नाही. घाटकोपर मेट्रो स्थानकाला काल बंदोबस्त दिला होता का ? सगळे पोलीस यांच्या बंदोबस्तात असतात. काल सगळ्या संस्था होत्या कुठे ? या राजवटीची प्राथमिकता ही पहिल्यापासूनच कॉन्ट्रॅक्टर राहिली आहे. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातं आहे त्याद्वारे प्रशासन सुरू असून असा घटनाबाह्य मुख्यमंत्री कोणी बघितला नसेल. मुंबई पालिकेत १५ सहायक आयुक्त नाहीत वॉर्ड ऑफिसर नाहीत. यांचेच लोक सगळीकडे भरले आहे . एवढं भयानक काम याआधी कधी पाहिलेलं नव्हत. मुंबई ठाणे पुण्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. आमचे सरकार असताना पंप लावायचो, लोक रस्त्यावर असायचे, काल काहीच नव्हत असं म्हणत सरकारच्या कामकाजावर टीका केली.

पंतप्रधानांचा दौरा रद्द केला, पण सामान्यांना झालेल्या त्रासाचं काय ?- आदित्य ठाकरे

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावरून आदित्य ठाकरे म्हणाले की, मुसळधार पावसाच्या इशाऱ्या नंतर पंतप्रधानांचा आजचा पुणे दौरा रद्द केला करण्यात आलाय, ‘पंतप्रधानांचा पावसाच्या इशाऱ्यामूळे दौरा रद्द केला . पण सामान्यांना जो त्रास झाला त्याच काय ? भाजपाने सांगावं की पुणे आपल्याच देशात आहे, परदेशात नाही. मग मोदीचं पुण्यात यायचं बंद होईल अशी खोचक टीकाही यावेळी केली.

स्टॅच्यु ऑफ युनिटी पक्की बांधली, मग महाराजांचा पुतळा का कमकुवत बनवला ?

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, महाराजांच्या पुतळा उभारणीत झालेल्या खर्चापेक्षा उस्तवमुर्तीवर खर्च जास्त झाला होता आणि भाजपाने गुजरातमध्ये स्टॅच्यु ऑफ युनिटी पक्की बांधली, मग आमच्या महाराजांचा पुतळा का कमकुवत बनवला ? असा सवाल करत मविआ सरकार आल्यावर पुतळा उभारणीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार आणि दुर्लक्षिततेची चौकशी करणार असल्याचा इशारा दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत