Breaking News

कृषी

बोंडअळी व तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांना मदत तीन वेळा देणार कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे विधानसभेत आश्वासन

नागपूर: प्रतिनिधी मराठवाडा आणि विदर्भातील कापूस उत्पादनावर बोंडअळीचा हल्ला झाला. या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या. त्यानुसार अशा शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले असून बोंडअळी बरोबरच तुडतुड्याच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार, बियाणे विकणाऱ्या कंपन्या आणि विमा कंपन्याकडून मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन …

Read More »

फक्त पाच वर्षे अफूची शेती करायची परवानगी द्या शिवसेनेच्या सुभाष साबणे यांची विधानसभेत मागणी

नागपूर : प्रतिनिधी मराठवाडा आणि विदर्भातील शेतीच्या मालाला हमीभाव दिल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. जर हमीभाव देत नसाल तर किमान आमच्या भागातील शेतकऱ्यांना पाच वर्षे अफूची शेती करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून शेतकरी या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडू शकेल. त्यामुळे अफूची शेती करण्याची परवानगी देण्याची मागणी शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे …

Read More »

दूध दराच्या प्रश्नावरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी अध्यक्ष बागडे यांच्या खुलाशाने सरकार अडचणीत

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना २७ रू. प्रति लिटर दूधाचा दर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र सहकारी दूध संघांना हा दर परवडत नसल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत एखादे संस्था उभारणे अवघड आहे. मात्र उध्दवस्त करणे सोपे असल्याची टीका केली. त्यावर पशु …

Read More »

कर्जमाफीच्या कामासाठी आज आणि उद्या बँका सुरु राहणार सर्व जिल्हा सहकारी बँकासह इतर बँकांना कार्यालये सुरु ठेवण्याच्या सूचना

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारने १९ हजार ५३७ कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी दिली. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासह इतर कर्जमाफीच्या कामाकरीता राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँकासह बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज शनिवार ९ डिसेंबर आणि रविवारी १० …

Read More »

कर्जमाफीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील बँकाना निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारकडून आतापर्यंत ४१ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत  मंजूर केलेले १९ हजार ५३७ कोटी रूपये तात्काळ बँकांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मलबार हिल येथील सह्याद्री …

Read More »

कर्जमाफी योजनेंतर्गत १९ हजार ५३७ कोटी रूपये मंजूर ४१ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांसाठी १९, ५३७ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास ३१ डिसेंबर उजाडेल असे वक्तव्य सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केल्यानंतर दोन तीन …

Read More »

बोंडअळी, तुडतुडे यांच्या प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

 मुंबई : प्रतिनिधी राज्यात यंदाच्या खरीप हंगामात अनेक जिल्ह्यातील कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव तर धान पिकावर तुडतुड्या किड्याचा रोग पसरल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे विरोधकांकडून कापूस आणि धानाच्या झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यानुसार अखेर राज्य सरकारने या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे …

Read More »

केंद्र सरकारने आयात शुल्कवाढविल्याने सोयाबीन, उडीद, मुगाला भाव कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा दावा

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशभरातील सोयाबीन, मुग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असून त्याचे श्रेय केंद्र सरकारच्या ५ ऑगस्ट ते १७ नोव्हेंबर दरम्यान काढण्यात आलेल्या आदेशाला आहे. या आदेशामुळे महाराष्ट्रातील सोयाबीनला किमान २७५० ते २९९० तर उडीदला ३५०१ ते ५६०० इतका मिळण्यास सुरुवात झाली असून खाजगी कंपन्या ३१५० हून …

Read More »

दहा भूविकास बँकांच्या मालमत्ता विक्रीची प्रकिया लवकरच मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्देश

मुंबई : प्रतिनिधीराज्यात सध्या कोणत्याही प्रकारची न्यायालयीन स्थगिती नसलेल्या १० भूविकास बँकांच्या मालमत्ता विक्रीची प्रक्रिया तातडीने राबवावी असे, निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित, मुंबई व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांच्या मालमत्तांबाबत निर्णय घेण्यासाठी सहकारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ …

Read More »

राज्य सरकारकडून कर्जमाफीच्या माहितीला डिजिटल कुलूप

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सत्तास्थानी विराजमान झाल्यापासून भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक कारभाराचा ढोल वाजविणारे फडणवीस सरकार ऑनलाईन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून टीकेचे धनी ठरले आहे. या ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याऐवजी त्या त्रुटीच झाकण्याचा प्रकार राज्य सरकारकडून करण्यात येत असून आपले सरकार संकेतस्थळावरील कर्जमाफीच्या माहीतीवर नियंत्रण लादत डिजिटल कुलूप लावल्याची धक्कादायक बाब …

Read More »