Breaking News

भाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे ‘ठग ऑफ महाराष्ट्र’! धनगर, मुस्लीम समाजालाही जल्लोषाची संधी का नाही? विरोधी पक्षांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी मागील ४ वर्षांपासून राज्यात केवळ ठगबाजी करणारे भाजप-शिवसेनेचे सरकार ‘ठग ऑफ महाराष्ट्र’असल्याचा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ हा चित्रपट फ्लॉप करणारी जनता आता महाराष्ट्रातील या ठगांनाही भूईसपाट केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या …

Read More »

मराठा समाजाला एसईबीसी या स्वतंत्र प्रवर्गाखाली आरक्षण देणार मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारने स्विकारल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला मिळाला आहे. या अहवालातील शिफारसीनुसार मराठा समाजाला एसईबीसी अर्थात सामाजिक-शैक्षणिक मागास वर्ग या स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर …

Read More »

दुष्काळाचे गांर्भिय लक्षात घेवून तात्काळ निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्या शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचे गांर्भिय लक्षात घेवून राज्यसरकारने निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पाऊले उचलून जनतेला दिलासा दयावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले असून त्यासोबत दुष्काळी संकटाशी सामना करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही पाठवली आहे. महाराष्ट्राच्या …

Read More »

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्जः खा. अशोक चव्हाण सलग तीन दिवसांच्या मॅराथॉन बैठकीत मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला

मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दि. १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये राज्यातील ४२ लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकांमध्ये मोठ्या संख्येने आलेल्या इच्छुक …

Read More »

राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा ? विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा? हा अहवाल अद्याप सार्वजनिक झालेला नसताना आणि त्यातील शिफारसींची अधिकृत माहिती नसताना मुख्यमंत्री त्याआधारे घोषणा करतात कसे? आयोगाचे सदस्य प्रसारमाध्यमांपुढे जाऊन भाष्य करतात कसे? असे अनेक सवाल उपस्थित करून यासंदर्भात हक्कभंग आणण्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील …

Read More »

शासकिय अधिकाऱ्यांनो फक्त चांगलीच माहीती द्या मुख्यमंत्र्यांनी फर्मान दिल्याचे आयएएस अधिकाऱ्यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राजकिय फायद्यासाठी सत्ताधारी राजकिय पक्षांकडून शासकिय यंत्रणेचा गैरवापर करण्याचे प्रकार आतापर्यंत अनेकदा झाले. परंतु आगामी निवडणूका जिंकायच्याच आणि पुन्हा सत्तास्थानी यायचेच या उद्देशाने शासकिय सेवेतील सर्वच आयएएस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच वापरण्याचा अश्लाघ्य प्रकार विद्यमान राज्य सरकारकडून सुरु असल्याची माहिती एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. …

Read More »

मराठा आरक्षणाचे विधेयक आगामी अधिवेशनात मंजूर होणार ? अहवालाचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची लगबग

मुंबईः प्रतिनिधी अखेर राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाला द्यावयाच्या आरक्षणासंबधीचा अहवाल गुरूवारी राज्य सरकारला सादर करण्यात आला. या अहवालाचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रशासनातील ६ अभ्यासू अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. तसेच या हिवाळी अधिवेशनातच याविषयीचे विधेयक मांडून मंजूर करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मराठा …

Read More »

जगातील ११४.३१ हजार नागरिकांशी बडोले साधला ई-संवाद सरकारच्या योजना आणि अपेक्षांबाबतच्या सूचना मंत्र्यांनी स्विकारल्या

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जाती, दिव्यांग, ,विमुक्त आणि भटक्या जमाती, निराश्रित आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती तसेच या योजनांचा लाभ मिळविण्यात येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी साधलेल्या ई-संवादात जगभरातील ११४.३१ हजार नागरिक सहभागी झाले. गुरूवारी सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय आणि विशेष …

Read More »

मुंबईच्या विकास आराखड्यावर १३.५९ कोटींचा खर्च एकट्या रमानाथ झा यांच्या वेतनावर ४६.५५ लाख रूपयांचा खर्च झाला

मुंबईः प्रतिनिधी बहुप्रतिक्षित असा मुंबईचा प्रारुप विकास आराखडा (२०३४) तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आजमितीपर्यंत १३.५९ कोटी रुपये खर्च झाला आहे. तर आराखडा समितीवर विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या रमानाथ झा यांच्या वेतनावर ४६.५५ लाख खर्च आणि सूचना व हरकती सुनावणीसाठी आयोजित सुनावणीसाठी नेमलेल्या 3 माजी सेवानिवृत्त अधिका-यांच्या …

Read More »

मराठा समाजाच्या परिस्थितीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर आयोगाच्या सदस्यांनी मुख्य सचिवांना केला सुपूर्द

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीबाबतचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांना सुपूर्द करण्यात आला. मुख्य सचिवांच्या समिती कक्षात आयोगाचे सदस्य सचिव डी. डी. देशमुख यांनी मुख्य सचिवांना अहवाल सुपूर्द केला. यावेळी आयोगाचे तज्ज्ञ सदस्य अंबादास मोहिते उपस्थित …

Read More »