Breaking News

फितूर साक्षीदारांवर कारवाईसाठी सरकार सत्र न्यायालयात दाद मागणार अखेर आगेप्रकरणी राज्य सरकारकडून भूमिका जाहीर

मुंबई : प्रतिनिधी खर्डा (जि. अहमदनगर) येथील नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी १३ साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील ९ आरोपी निर्दोष सुटले. याबाबत राज्य सरकार अतिशय गंभीर असून फितूर साक्षीदारांवर कारवाई होण्यासाठी अहमदनगर सत्र न्यायालयात दाद मागणार आहे. तसेच या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडून …

Read More »

बोंडअळी, तुडतुडे यांच्या प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

 मुंबई : प्रतिनिधी राज्यात यंदाच्या खरीप हंगामात अनेक जिल्ह्यातील कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव तर धान पिकावर तुडतुड्या किड्याचा रोग पसरल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे विरोधकांकडून कापूस आणि धानाच्या झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यानुसार अखेर राज्य सरकारने या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे …

Read More »

अखेर अनेक वर्षानंतर चार आदिवासी पाडे सोलर दिव्यांमुळे झाले प्रकाशमय वणीचा, चाफ्याचा, केल्टी पाडा येथे बायोटॉयलेटची व्यवस्था

मुंबई : प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून आरे कॉलनीतील आदीवासी पाड्यांमध्ये वीज, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत होती. यावर अनेक वेळा विधिमंडळाच्या अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर गृहनिर्माण मंत्री रविंद्र वायकर यांच्या प्रयत्नातून या चार आदिवासी पाड्यांच्या परिसरात तब्बल २७ सोलर दिवे, तीन आदिवासी …

Read More »

१२ जानेवारीपासून सुरू होणार ‘बारायण’ हटके मनोरंजन कथा

१२ जानेवारीपासून सुरू होणार ‘बारायण’ विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक संदेश न देता पालकांसह संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करणारा ‘बारायण’ हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कोणते कलाकार आहेत ? या प्रश्नाचे उत्तर ‘बारायण’ च्या अँथम सॉंग मधून प्रेक्षकांना मिळाले आहे. पोस्टर आणि मोशन पोस्टरमधून …

Read More »

माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे आणि श्यामसुंदर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल गृहनिर्माण संस्थेस जादा टीडीआर आणि व्यावसायिक वापराची परवानगी दिल्याप्रकरणी एसीबीची कारवाई

मुंबई : गिरिराज सावंत ओशिवरा येथील एका गृहनिर्माण संस्थेस दिलेल्या निवासी भूखंडास वाणिज्यिक वापरासाठीची परवनागी देत जास्तीचा टीडीआर दिल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे आणि श्यामसुंदर शिंदे यांच्यावर  गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल करताना गृहनिर्माण विभाग किंवा राज्य सरकारची कोणतीही परवानगी एसीबीने …

Read More »

ओखी वादळामुळे मुंबईच्या जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कोकणात पावसाची हजेरी

मुंबई : प्रतिनिधी अरबी समुद्रातून मुंबईहून गुजरातच्या दिशेने रवाना होत असलेल्या ओखी वादळामुळे मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कोकणात काल संध्याकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. कधी मध्यम स्वरूपाचा तर कधी हलक्या स्वरूपात कोसळणाऱ्या पावसाबरोबरच गार वाराही वाहत आहे. त्यामुळे मुंबईची जीवन वाहीनी असलेल्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होत असून वातावरण असेच राहीले तर …

Read More »

आगे खूनप्रकरण सरकारवर उलटू नये यासाठी भाजपची पळापळ मुणगेकरांनी भेट घेण्याआधीच खा. साबळेंनी घेतली नितीनच्या आईवडीलांची भेट

मुंबई : प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील दलित नितीन आगे खून प्रकरणी सर्व साक्षीदार फितूर झाल्याने आरोपींची निर्दोष सुटका झाली. त्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र नितीनच्या खून प्रकरणात न्याय मिळावा यासाठी त्याच्या आई-वडीलांनी थेट मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. परंतु यामुळे दलित समाजाचा रोष राज्य सरकारवर निर्माण …

Read More »

“तेरा मुझसे है पहले का नाता कोई…” ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी देखणा चेहरा, मधुर वाणी, मनमोहक अभिनय आणि सहजसुंदर देहबोलीच्या बळावर पाच दशकांहूनही अधिक काळ सिनेसृष्टीची सेवा करीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (७९) यांनी आज या जगाचा निरोप घेतला. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची …

Read More »

हिवाळ्याच्या सुरुवातीलाच विरोधकांकडून राजकिय वातावरण तापविण्याचा प्रयत्न सरकार विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल तर काँग्रेसकडून शेतकरी संघटनांना एकत्र आणण्याचे काम

मुंबईः प्रतिनिधी वातावरणातील बदलामुळे काहीशा उशीरानेच सुरु झालेल्या हिवाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या शेतकरी संघटनांना एकत्रित आणण्याचे काम सुरु केले आहे. तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने यवतमाळ ते नागपूर असा शेतकऱ्यांचा मोर्चाच काढला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरण्यात येणार …

Read More »

केंद्र सरकारने आयात शुल्कवाढविल्याने सोयाबीन, उडीद, मुगाला भाव कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा दावा

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशभरातील सोयाबीन, मुग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असून त्याचे श्रेय केंद्र सरकारच्या ५ ऑगस्ट ते १७ नोव्हेंबर दरम्यान काढण्यात आलेल्या आदेशाला आहे. या आदेशामुळे महाराष्ट्रातील सोयाबीनला किमान २७५० ते २९९० तर उडीदला ३५०१ ते ५६०० इतका मिळण्यास सुरुवात झाली असून खाजगी कंपन्या ३१५० हून …

Read More »