Breaking News

तायक्वांडोमुळे हिमांशू बनला अभिनेता ‘सोबत’ चित्रपटाद्वारे करणार सिनेसृष्टीत पदार्पण

मुंबई : प्रतिनिधी नशीबाचा खेळ कधीच कुणाला कळला नाही. मोठेपणी समाजात ठामपणे उभं राहायचं असेल तर अभ्यास करण्याचा सल्ला सर्वांनाच मिळत असतो. त्या जोडीला आणखी एक पर्याय खुला ठेवण्यासाठी एखाद्या खेळात प्रावीण्य मिळवण्याकडेही पालक आणि पाल्यांचा कल असतो. पण इतकं करूनही काहीजण एखाद्या भलत्याच क्षेत्रात नावलौकीक मिळवतात. यात रुपेरी पडद्यावर …

Read More »

भाजपच्या कर-नाटकीच्या विरोधात काँग्रेसचे लोकशाही वाचवा आंदोलन मुंबईत प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे

मुंबई : प्रतिनिधी कर्नाटक राज्यातील सरकार स्थापनेवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या राजकिय कुरघोडींना मोठ्या प्रमाणावर ऊत आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे आजचा दिवस राज्यभरात लोकशाही वाचवा (प्रजातंत्र बचाओ) दिवस म्हणून पाळत जात असून लोकशाही विरोधी भाजप सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस …

Read More »

बौद्ध विवाह कायदा तयार करण्यात आता नागरीकांचाही सहभाग महत्वाचा कायद्याच्या मसुद्यासंदर्भात हरकती व सूचना करण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बौद्ध समाजासाठी बौद्ध मंगल परिणय (विवाह) कायद्याचा मसुदा सामाजिक न्याय विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov. in व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, यांच्याhttp://www.barti.in या संकेतस्थळावर एक महिन्याकरिता प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कायद्याच्या तरतुदींबाबत जनतेच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव यांनी …

Read More »

महाराष्ट्रातील कृष्णा, मुळा-मुठा नद्या होणार स्वच्छ केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या पुढाकाराने देशातील ४८ नद्या व समुद्र किनारे होणार स्वच्छ

नवी दिल्ली : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील १९ राज्यातील ४८ नद्या व समुद्र किना-यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कृष्णा, मुळा-मुठा नद्या आणि मि-या व गणपतीपुळे समुद्र किनारे यांचा समावेश या मोहिमेत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यावर्षी जागतिक पर्यावरण …

Read More »

अर्धवट मार्गावर धावणाऱ्या मोनो रेल्वेच्या खर्चात २३६ कोटींची वाढ आरटीआयमधून मिळाली माहिती

मुंबई : प्रतिनिधी देशात प्रथमच शुभारंभ करण्यात आलेली मोनो रेल्वेचा टप्पा १ आणि टप्पा २ यासाठी अपेक्षित खर्च रु २ हजार ४६० कोटी असून आता या खर्चात रु.२३६ कोटींची वाढ झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. आधीच विलंबाने मोनोरेल प्रकल्प हा मुंबईकरांच्या दृष्टीने महागडा सिद्ध …

Read More »

शाहरूख खानच्या नंबर वन मुळे अमिताभ बच्चनची ट्वीटरला धमकी स्कोर ट्रेंड्स इंडिया फेसबुक चार्ट्सवर नंबर वन बनलेल्या बिग बींचा ट्विटरला टोला!

मुंबई : प्रतिनिधी महानायक अमिताभ बच्चन फेसबुकवर ३० दशलक्ष फोलोअर्ससह भारतीय फिल्म इंडस्ट्रीतले ‘मोस्ट एंगेंजिंग सेलिब्रिटी ऑन फेसबुक’ बनले आहेत. बिग बींनी स्कोअर ट्रेड्स इंडियाद्वारे दिलेल्या या माहितीचं समर्थन ट्विटवर केलं आहे. बिग बींच्या एका चाहतीने स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या चार्टची आकडेवारी ट्विट केली होती. अमिताभ बच्चन यांनी ती रिट्विट करत …

Read More »

आमीर खान, नागराजच्या उपस्थितीत रंगणार ‘शिवाजी अंडरग्राऊंड’चा ७०० वा प्रयोग ! २१ मे रोजी यशवंतराव नाट्यगृह मध्ये होणार सादर

मुंबई : प्रतिनिधी शाहिरी जलशाच्या शैलीत समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकानं महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या नाटकाचा गौरवशाली ७०० वा प्रयोग २१ मे रोजी मुंबईतल्या यशवंतराव  नाट्यगृह, माटुंगा येथे सायंकाळी ६ वाजता रंगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या प्रयोगाला प्रसिद्ध अभिनेता आमीर खान, दिग्दर्शक …

Read More »

मुंबई बाजार समितीला राष्ट्रीय बाजार आवार म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरु आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील महत्वाची बाजारपेठ असून मुंबई बाजार समिती ही राष्ट्रीय बाजार आवार म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या बाजार समितीच्या आवारात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले. व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत आज पणनमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी आमदार …

Read More »

गृहनिर्माण, विमानतळ निर्मितीसाठी सिंगापूरमधील कंपन्यांशी करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे व्यापार मंत्री एस.ईश्वरन यांच्यात सामंज्यस करारावर सह्या

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील गृहनिर्माणाच्या महत्त्वाकांक्षी उद्द‍िष्टांसह विविध क्षेत्रांत महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीचे प्रयत्न विकासाचे पर्व निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. महाराष्ट्र -सिंगापूर संयुक्त समितीची स्थापना व कार्यकक्षा निश्चितीबाबतच्या महत्त्वपुर्ण मसुद्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि सिंगापूरचे उद्योग व व्यापार मंत्री एस. ईश्वरन यांनी स्वाक्षरी केली. यावेळी पुणे …

Read More »

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचा आराखडा दोन महिन्यात येणार सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या चिरागनगर येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा येत्या दोन महिन्यात प्राप्त होईल त्यांनंतर त्यासाठी लागणारा खर्च आणि पुढील कार्यवाही घोषित केली जाईल अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंत्रालयात  दिली. अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे ही खूप वर्षांपासूनची मागणी आहे.  या …

Read More »