Breaking News

राज्यात दोन्ही काँग्रेस आणि समविचारी पक्षांना घेवून निवडणूका लढणार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी चर्चा झाली असून महाराष्ट्रात एकत्र निवडणूका लढवायचा निर्णय झाल्याने जागा वाटपामध्ये अडचण येणार नाही. मुंबईमध्ये एकत्र लढणार आहोत. त्यामुळे जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलताना दिली. या सभेला …

Read More »

मी राष्ट्रवादीचा सहयोगी सदस्य म्हणून आमदाराकीची शपथ घेणार लातूर विधान परिषदेचे उमेदवार अशोक जगदाळे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणूकीतील लातूर-उस्मानाबाद-बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी मैदानातून माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा देत त्यांनाच या जागेवरून निवडूण आणण्याची घोषणाही राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याने या निवडणूकीत विजयी झाल्यानंतर आमदारकीची शपथ राष्ट्रवादी काँग्रेसचा …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर आणि विमान प्रवासावर वर्षाकाठी सरासरी ६ कोटींचा खर्च हेलिकॉप्टर अपघात आणि वैमानिकांच्या कमतरतेमुळे खर्चात वाढ

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर आणि विमान प्रवासावर वर्षाकाठी सरासरी ६ कोटी रूपयांचा खर्च होत असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे. हेलिकॉप्टर अपघात आणि वैमानिकांच्या कमतरतेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर आणि विमान प्रवासाच्या खर्चात वाढ झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल …

Read More »

पलूस निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस, शिवसेनेत अंडरस्टँडींग स्व. पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजीत कदम यांना जाहीर पाठिंबा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पालघर आणि भंडारा येथील दोन लोकसभा जागांसाठी आणि विधानसभेसाठी सांगली जिल्ह्यातील पलूस या मतदारसंघातील एका जागेबरोबरच विधान परिषदेच्या ६ रिक्त जागांसाठी निवडणूकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना भाजप- शिवसेनेत मात्र मोठ्या प्रमाणावर दरी निर्माण झाली आहे. मात्र दुसऱ्याबाजूला पलूस आणि पालघर जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत …

Read More »

परदेशी माध्यम शिष्टमंडळात आले आणि बालपणीच्या वर्ग मित्राला भेटले मुख्य सचिवांना भेटला 'बालपणीचा वर्गमित्र'!

मुंबई : प्रतिनिधी दोन देशांमधील सौहार्दपूर्ण संबंध अधिक बळकट व्हावे यासाठी विविध प्रकारची शिष्टमंडळे महाराष्ट्राच्या भेटीवर येत असतात. त्यातच अशाच एका शिष्टमंडळात आपला वर्गमित्र असणे आणि त्याची अनेक वर्षानंतर अचानक भेट होणे ही सुखद आश्चर्याचा धक्का देणारी घटना राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या बाबतीत काल घडली. एखाद्या चित्रपटातील …

Read More »

जयंत पाटील स्टाईलने पदाधिकाऱ्यांचेच केले क्रॉस व्हेरिफिकेशन युवा कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मार्गदर्शक

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काम करण्याची स्टाईल कशी हटके आहे हे जगजाहीर आहे. मात्र नवीन प्रदेशाध्यक्षांच्या काम करण्याच्या निराळ्या पद्धतीचे दर्शन आज पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनाही घडले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळ्यापासून अत्यंत धडाडीने आपल्या कामाची सुरुवात केली आहे. आज मुंबई …

Read More »

५ लाख ७९ हजार ५३१ कोटी रुपयांच्या पतधोरणास मंजुरी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बँकर्स समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी बँकर्स समितीच्या २०१८-१९ च्या ५ लाख ७९ हजार ५३१ कोटी रुपयांच्या पतधोरणास आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी ८५ हजार ४६४. ४७ कोटी रुपयांचा समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात १०.७० टक्के वाढ करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री …

Read More »

घराघरात शिक्षण पोहोचविणाऱे कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पंतप्रधानांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच आणि त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे बहुजन समाजाच्या अनेक पिढया ज्ञानाच्या प्रकाशात उजळून निघाल्या. त्यामुळेच कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. …

Read More »

राहुल गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या वक्तव्याची कोणी खिल्ली उडवू नये काँग्रेसच्या मदतीला शिवसेना धावली

मुंबई : प्रतिनिधी लोकशाहीत पंतप्रधान होण्याची भूमिका मांडण्याचा राहुल गांधींचा अधिकार आहे. त्याची कुणी खिल्ली उडवू नये असा इशारा भाजपला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी याच अधिकारातून पंतप्रधान झाले आहेत. खरंतर अडवाणी व्हायला हवे होते असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मदतीला धाव घेतली. …

Read More »

दुधाला किमान आधारभूत दर देण्यासाठी कायदा करणार आमदार बच्चु कडू यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर पदुम मंत्री महादेव जानकर

मुंबई : प्रतिनिधी दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर देण्यासाठी किमान आधारभूत दराचा कायदा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून याद्वारे ऊस पिकाप्रमाणेच ७०:३० टक्क्याच्या गुणोत्तराचा अवलंब करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी तात्काळ केली जाईल, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धविकास व …

Read More »