Breaking News

विधान परिषद निवडणूक प्रक्रियेस आयोगाकडून स्थगिती निवडणूक आयोगाकडून आचार संहिता मागे

मुंबई : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने दि. १४ मे २०१८ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये महाराष्ट्र विधानपरिषदच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या ‍द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकरिता लागू करण्यात आलेली आचारसंहिता मागे घेण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्याचे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले …

Read More »

खरीप हंगामासाठी कापूस बियाण्यांची २ कोटी पाकीटे उपलब्ध कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी खरीप २०१८ मध्ये कापूस लागवडीसाठी राज्यात ४२ कंपन्यांच्या माध्यमातून २ कोटी पाकीटे बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार असून साधारणत: ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. या वर्षी प्रथमच सुमारे ५ हजार बियाणांचे नमुने पेरणीपूर्व तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर …

Read More »

पाकिस्तानातून दाऊदला आणण्याचे आश्वासन देणा-या मोदींनी दाऊदऐवजी साखर आणली देशातल्यापेक्षा पाकिस्तानी शेतक-यांची जास्त चिंता असल्याची खा. अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी देशात आणि राज्यात यावर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामातील साखर मोठ्या विक्रीविना पडून आहे. तरीही सरकारने पाकिस्तानातून लाखो टन साखर आयात केली. यामुळे साखरेचे दर कोसळणार असून याचा फटका साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतक-यांना बसणार आहे. पाकिस्तानातून कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याचे आश्वासन देणा-या …

Read More »

आदीवासी विद्यार्थी सोयी-सवलतींच्या प्रतिक्षेत पाठ्यपुस्तके, पाणी, वसतिगृहाच्या समस्येतही शिक्षण पूर्ण करण्याची आस

मुंबई : कविता वरे राज्यातील मुख्य प्रवाहातील समाजाबरोबर डोंगर दऱे, जंगलात राहणाऱ्या आदीवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता आश्रमशाळांना केंद्र सरकारने मान्यता दिली. यातील काही शाळा राज्य सरकार तर काही खाजगी संस्था चालकांकडून चालविल्या जात आहेत. मात्र या शाळांमधील विद्यार्थ्यांना २१ व्या शतकात जगाने पाऊल ठेवूनही पुरेशी पाठ्यपुस्तके, …

Read More »

ऊस उत्पादक शेतकरी मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी पाकिस्तानच्या साखरेचे स्वागत या देशात व्हायला लागले तर या देशातील ऊस उत्पादक शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाकिस्तान साखर खरेदीवर केंद्र सरकारला दिला आहे. आज पाकिस्तानची साखर देशात यायला लागली. म्हणजे आपण पाकिस्तानची …

Read More »

पलुसमध्ये भाजपची माघार मात्र पालघर मध्ये शिवसेनेचा नकार भाजपची राजकिय कोंडी

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व.पतंगराव कदम यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यातील पलूस विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक होत आहे. या निवडणूकीत काँग्रेसकडून कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली. तर त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा शिवसेनेने पाठिंबा देत उमेदवार न देण्याचे जाहीर करत पाठिंबा दिला. मात्र भाजपने संग्रामसिंह देशमुख यांना …

Read More »

पंतप्रधान मोदींकडून ४६ महिन्यात जाहीरातबाजीवर ४ हजार कोटींची उधळपट्टी चोहोबाजूंच्या टिकेनंतर चालू वर्षाच्या खर्चात २५ टक्यांची कपात

मुंबई : प्रतिनिधी देशाच्या सर्वोच्च पदी अर्थात पंतप्रधान पदी विराजमान होण्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारकडून जाहीरातबाजीवर करण्यात येत असलेल्या खर्चावर प्रश्न विचारले जात होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ४६ महिन्याच्या कारकिर्दीत सरकार आणि स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर ४ …

Read More »

राजकीय हित साधण्यासाठीच सरकारकडून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा आरोप

औरंगाबाद : प्रतिनिधी भीमा-कोरेगाव आणि औरंगाबाद येथील घटना पा‍हता सामाजिक अशांतता निर्माण करुन राजकीय हित साधण्‍याचा सरकारचा प्रयत्‍न दिसतो. स्‍थानिक पातळीवर सत्‍ताधारी पक्षाचे खासदारही प्रक्षोभक वक्‍तव्‍य करुन सामाजिक तेढ निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करतात, त्‍यांच्‍यावर सरकार कारवाई करणार का? असा सवाल करुन औरंगाबाद येथील घटनेत गृहखाते पूर्णतः अपयशी ठरले असल्‍याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी …

Read More »

बीडीडी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला राज्य सरकारच्या होकाराची प्रतिक्षा म्हाडाकडून फक्त ३ हजार ५०० कोटीचे फायनान्शियल मॉडेल तयार

मुंबई : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे ना.म.जोशी रोड, वरळी, नायगांव येथील खुराड्या वजा घरात रहात असलेल्या बीडीडीतील चाळकरी मुंबईकरांना ५०० चौ.फु.चे घर मिळणार आहे. या चाळींच्या पुर्नविकासासाठी म्हाडाला तब्बल ४५ हजार कोटीं रूपयांची गरज लागणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ३ हजार ५०० कोटी रूपयांचे फायनान्शियल मॉडेल म्हाडाने तयार केले …

Read More »

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त मुंबईत १६ मे रोजी परिषद कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार

मुंबई : प्रतिनिधी जागतिक कृषी पर्यटन दिनी शेतकऱ्यांची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण पर्यटन परिषद तसेच कृषी  पर्यटन पुरस्कार वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला आहे. या परिषदेचे उद्घाटन येत्या दिनांक १६ मे रोजी सकाळी ९.३० वाजता कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार …

Read More »