Breaking News

महेश कोठारेंच्या पाणी चित्रपटाचा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते शुमारंभ पाणी टंचाई आणि ग्रामीण जीवनाचे विदारक वास्तवाचे दिग्दर्शन आदीनाथ कोठारे करणार

नांदेड : प्रतिनिधी ग्रामीण भागातील भीषण पाणीटंचाई व ग्रामीण जीवनाची विदारकता दाखविणारा सुप्रसिद्ध सिनेनिर्माता महेश कोठारे निर्मित व आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ या मराठी चित्रपटाचा शुभारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. हा चित्रपट ग्रामीण जीवनातील विदारक आर्थिक परिस्थिती व पिण्याच्या …

Read More »

मुंबईत १५ तारखेपासून सेवा क्षेत्रातील उद्योगांचे जागतिक प्रदर्शन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’च्या यशानंतर मुंबईत प्रथमच चार दिवसांची ‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हीसेस’मुंबईत येत्या १५ तारखेपासून आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला २२ सेवा क्षेत्रातील १०० देशांमधून पाच हजार पेक्षा जास्त सेवा उद्योजक सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते होणार असून, राज्यपाल चे.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग …

Read More »

औरंगाबादच्या हिंसाचारास मुख्यमंत्र्यांचे गृहखाते जबाबदार विधानसभा विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादचा हिंसाचार हे राज्य सरकारचे मोठे अपयश असून, पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यामुळेच शहराची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. कायदा सुव्यवस्थेच्या निर्माण झालेल्या प्रश्नाला गृह खातेच जबाबदार असल्याचा आरोप करून या हिंसाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. औरंगाबादच्या हिंसाचारासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त …

Read More »

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा आणखी एक बळी ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचे टिकास्त्र

नांदेड : प्रतिनिधी कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज भरुन सुध्दा न मिळालेली  कर्जमाफी व पिकविलेल्या शेतीमालास मिळालेला कवडीमोल भाव, यामुळे अडचणीत आलेल्या यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शेतकरी शामराव भोपळे यांनी भाजप सरकारला जबाबदार धरत स्वतःला जाळून घेतले. त्यांनी मृत्यूशी झुंज देत आज अखेरचा श्वास घेतला. शामराव भोपळे यांची आत्महत्या नसून ही …

Read More »

परवडणाऱ्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात असाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निर्देश देत नियोजन प्राधिकरण म्हणुन म्हाडाची नियुक्ती

मुंबई: प्रतिनिधी परवडणारी घरे ही किमतीने सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहणारी असावी असे सांगत सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी)अंतर्गत परवडणा-या घरांची होणारी निर्मीती ही गुणवत्तापुर्ण असावी यासाठी त्रयस्थ यंत्रणेमार्फत मुल्यमापन करण्याची सुचना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी म्हाडाची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले. आज सहयाद्री येथे सर्वाना परवडणारी …

Read More »

अण्णा हजारेंना हवेत व्यवस्था परिवर्तनासाठी कार्यकर्त्ये फक्त सत्ता बदलल्याने देशात खरे परिवर्तन होत नाही तर व्यवस्था परिवर्तन गरजेचे

मुंबई : प्रतिनिधी दिल्लीतील मोदी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी पुकारलेल्या आंदोलनाचा फियास्को झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता पुन्हा व्यवस्था परिवर्तन चळवळ उभारण्याची तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे या चळवळीसाठी नव्याने कार्यकर्त्ये जमा करण्यासाठी प्रयत्न सुरु असून  भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे राज्यात मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक …

Read More »

तंत्र शिक्षणाची सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आता ऑनलाईन मिळणार उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा सीडीएसएल व्हेंचर लिमिटेडशी सामंजस्य करार

मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व पदविका प्रमाणपत्र प्राप्तविद्यार्थ्यांची अंदाजे 9 लाख शैक्षणिक प्रमाणपत्रे राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजीटल पद्धतीने नोंदणी करुन जतनकरुन ठेवण्यात येणार आहेत.  यासंदर्भात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सामंजस्यकरार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद म. मोहितकर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसलिमिटेडच्या अंतर्गत कार्यरत सीडीएसएल व्हेंचर लिमिटेडचे कार्यकारी संचालक तथा मुख्य तंत्रज्ञान  अधिकारी जॉयदिप दत्ता यांच्यात शैक्षणिक प्रमाणपत्रे ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबतचा हा सामंजस्य करार झाला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय व विश्वविद्यालय अनुदान आयोग यांच्या डिजीटल इंडियाच्या धोरणानुसार, ही नऊ लाख शैक्षणिक प्रमाणपत्रे राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजीटल पद्धतीने नोंदणी करुन जतन करुन ठेवण्यात येणार आहेत. प्रमाणपत्रातील माहितीची सत्यता, सचोटी, गोपनीयता व सुरक्षतेची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. यासेवेद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राची डिजीटल अथवा प्रिंटेड कॉपी …

Read More »

स्वत:वर गोळी झाडून घेत आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांची आत्महत्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन वर्षापासून कँन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले महाराष्ट्र पोलिस दलातील ज्येष्ठ आयपीएस अधिकारी तथा एटीएसचे प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज शुक्रवारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना सकाळच्या काळात घडल्याचे सांगण्यात येत आहे. हिमांशू रॉय हे १९८८ च्या बँचचे आयपीएस अधिकारी …

Read More »

अखेर खेडचा सेझ रद्द मुख्यमंत्र्यांकडून जमिन हस्तांतरण शुल्क माफ : स्थानिक शेतकऱ्यांकडून सत्कार

मुंबई : प्रतिनिधी ज्यांच्या भरवशावर राज्याचा डोलारा उभा आहे,त्या शेतकरी बांधवांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये अशीच शासनाची भुमिका आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिल्याचे सांगत पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर-खेड मधील निमगांव, कणेरसर, दावडी, केंदूर या चार गावातील सेझ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्र रद्द केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

राज्यात दोन्ही काँग्रेस आणि समविचारी पक्षांना घेवून निवडणूका लढणार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी चर्चा झाली असून महाराष्ट्रात एकत्र निवडणूका लढवायचा निर्णय झाल्याने जागा वाटपामध्ये अडचण येणार नाही. मुंबईमध्ये एकत्र लढणार आहोत. त्यामुळे जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलताना दिली. या सभेला …

Read More »