Breaking News

घराघरात शिक्षण पोहोचविणाऱे कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पंतप्रधानांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच आणि त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे बहुजन समाजाच्या अनेक पिढया ज्ञानाच्या प्रकाशात उजळून निघाल्या. त्यामुळेच कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. …

Read More »

राहुल गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या वक्तव्याची कोणी खिल्ली उडवू नये काँग्रेसच्या मदतीला शिवसेना धावली

मुंबई : प्रतिनिधी लोकशाहीत पंतप्रधान होण्याची भूमिका मांडण्याचा राहुल गांधींचा अधिकार आहे. त्याची कुणी खिल्ली उडवू नये असा इशारा भाजपला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी याच अधिकारातून पंतप्रधान झाले आहेत. खरंतर अडवाणी व्हायला हवे होते असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मदतीला धाव घेतली. …

Read More »

दुधाला किमान आधारभूत दर देण्यासाठी कायदा करणार आमदार बच्चु कडू यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर पदुम मंत्री महादेव जानकर

मुंबई : प्रतिनिधी दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर देण्यासाठी किमान आधारभूत दराचा कायदा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून याद्वारे ऊस पिकाप्रमाणेच ७०:३० टक्क्याच्या गुणोत्तराचा अवलंब करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी तात्काळ केली जाईल, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धविकास व …

Read More »

विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी नारायण राणेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा कोकणातील अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला स्वाभिमानीचा पाठिंबा

सिंधुदुर्ग: प्रतिनिधी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत खा. नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठींबा जाहीर केला असुन त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन आज ओरसगाव येथील पक्षाच्या मेळाव्यात केले आहे. यावेळी रा.कॉ.पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, आ. नितेश राणे, कोकण स्थानिक …

Read More »

नाशिक, नंदूरबारसह १३ जिल्ह्यातील जि.प.च्या शाळा होणार ‘आंतरराष्ट्रीय शाळा’ सिंगापूर, हाँगकाँग, जपान मधील शिक्षण पध्दतीवर शिक्षण देणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या सिंगापूर, हाँगकाँग, जपान या देशातील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून …

Read More »

उध्दव ठाकरे यांच्या भेटीला पंकज भुजबळ राजकिय उत्सुकता वाढीला

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या समर्थकांसह, स्वपक्षातील नेत्यांकडून केईएम हॉस्पीटलमध्ये रिघ लावली. मात्र छगन भुजबळ यांचे चिंरजीव आमदार पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची बुधवारी दुपारी भेट घेतली. तब्बल दोन वर्षानंतर छगन भुजबळ यांना जामीन …

Read More »

मराठी भाषा सक्तीच्या आदेशावर प्रधान सचिवांची इंग्रजीत सही आदेशावरील इंग्रजी सहीवर समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांचा आक्षेप

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व शासकिय कार्यालयात मराठी भाषेचा वापर सक्तीचा करावा यासाठी मराठी भाषा विभागाने काल ९व्यांदा शासन आदेश काढण्यात आला. मात्र या शासन आदेशावर या विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी मराठी भाषेतील सहीऐवजी इंग्रजीत सही करत तो प्रसिध्द करण्यात आला. त्यामुळे या आदेशाच्याच प्रसिध्दीत इंग्रजीचा वापर केल्याने …

Read More »

पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत पण राहुल गांधीना कौल असेल तर विरोध नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा राहुल गांधींना पाठींबा

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये सांगितले की, त्यांच्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळतील, त्यावेळी पंतप्रधान पदाची जबाबदारी घेईन. देशातील जनता त्यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी देणार असेल आणि तसा कौल घेणारच आहेत. तर त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब …

Read More »

पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई दि. ८ मे २०१८ राजेंद्र गावीत यांनी स्वार्थापोटी भाजपात प्रवेश केला असून गावीत हे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या  संपर्कात होते म्हणजे त्यांनी काँग्रेस पक्षात राहून पक्षाशी गद्दारी केली आहे. पालघर लोकसभा मतदार संघातील जनता गद्दारांना धडा शिकवेल अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली …

Read More »

राज्यातील २ हजार वाड्या पाड्यांना डिसेंबर २०१८ पर्यंत वीजजोडणी ऊर्जा विभागाचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्वच ४१ हजार ९२८ गावांचे, ९८ हजार ३५६ वाड्या पाड्यांचे तसेच ग्रामीण भागातील सुमारे १ कोटी ३७ लाख ९२ हजार घरांचे विद्युतीकरण झाले असून उर्वरित वाड्या पाड्यांत व घरांना सौभाग्य योजना तसेच दीनदयाल उपाध्याय योजनेतून डिसेंबर २०१८ पर्यंत वीज देण्याचे काम वेगात सुरू आहे. राज्यात ग्रामीण भागातील …

Read More »