Breaking News

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, बेराजगारांना नोकऱ्या आणि बेघरांना घरे देणार राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी निर्णयांचा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडून पुर्नउच्चार

मुंबई : प्रतिनिधी कर्जमाफीपासून वंचीत राहिलेल्या जवळपास ३ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, लातूर येथे होणाऱ्या रेल्वे डब्याच्या कारखान्यामुळे प्रत्यक्षात २५ हजार नोकऱ्यांची निर्मिती आणि पुढीलवर्षापर्यंत सर्व बेघरांना हक्काची घरे देण्यासाठी १२ लाख घरे बांधण्याचा मनोदय तसेच पुढील पाच वर्षात एक लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मिती या शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयाचा पुनरूच्चार करीत …

Read More »

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे सरकार घालवावेच लागेल अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. आज टिळक भवन दादर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर …

Read More »

डिजीटल ७/१२ देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी ग्रामीण भागात ७/१२ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पदोपदी याची आवश्यकता भासत असते. प्रत्येक गोष्टीसाठी सातबारा लागतो. गावामध्ये सातबारा मिळणे आणि तोही फेरफार करून मिळणे हे दिव्य असायचे. पण आता डिजिटल स्वरुपातील व स्वाक्षरी असलेला ७/१२ मिळणार असल्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. सध्या ४० हजार गावातील …

Read More »

अनामप्रेमच्या दोन दिव्यांग कन्यांना मिळाले जीवानाचे साथीदार वधू-वर मेळाव्यात ४०० जणांनी नोंदविला सहभाग

अहमदनगर : प्रतिनिधी समाजात पालक असूनही अनेक सदृढ व्यक्तींचे विवाह होत नाहीत. मात्र समाजात आणि जगात ज्यांचे कोणी नाहीत अशासाठी स्नेहाच्या अर्थात प्रेम आणि मैत्रीच्या भावनेतून अनामप्रेमाच्या मायेतून त्यांचा सांभाळ करणे आणि त्यांना मनुष्य म्हणून जगायला समर्थपणे उभे करणाऱ्या स्नेहालयच्या अनामप्रेमच्या दोन दिव्यांग कन्यांचा विवाह काल रविवारी २९/०४/२०१८ रोजी पार …

Read More »

शेतकऱ्यांच्या आत्महत्या लपवून अपघात दाखविणाऱ्यांवर ३०२ चे गुन्हे दाखल करा आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना १ लाखाची मदत देत मुलांच्या शिक्षणाची विखे-पाटील यांनी घेतली जबाबदारी

यवतमाळ : प्रतिनिधी कर्जमाफी व बोंडअळीची मदत न मिळाल्यामुळे स्वतःची चिता रचून आयुष्य संपवणारे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी माधवराव रावते यांच्या आत्महत्येचे पुरावे दडवून तो एक अपघात सिद्ध करण्याचा खटाटोप भाजप-शिवसेनेचे सरकार करते आहे. खून करून पुरावे दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंद्राणी मुखर्जी, अभय कुरूंदकर, युवराज कामटे आणि आत्महत्येचे पुरावे दडपणाऱ्या या सरकारमध्ये काहीही …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर देशातील समुद्र नसलेल्या राज्यात रिफायनरी प्रकल्प मग विदर्भात का नाही ? भाजप आमदार देशमुख यांचा सवाल

नागपूर : प्रतिनिधी समुद्र जर विदर्भात स्थलांतरीत करता आला असता तर नाणार येथील रिफायनरी प्रकल्पही विदर्भात स्थलांतरीत केला असता असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तोच त्यांच्याच पक्षाचे आणि नागपूरचे जिल्ह्यातील कटोलचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी हरियाणा, पंजाब, दिल्ली, मध्यप्रदेश, बिहार व आसाम या राज्यांमध्ये समुद्र किनारे नसताना …

Read More »

अधिकाऱ्यांमधील वादानंतर अखेर डी.के.जैन यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती नागपूर कनेक्शन कामाला आल्याची मंत्रालयात चर्चा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील तीन ज्येष्ठ अधिकाऱ्यांमधील मुख्य सचिव पदावरील दाव्याच्या वादानंतर अखेर राज्याच्या मुख्य सचिव पदी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश जैन यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. जैन हे दुपारी ४.३० वाजता आज सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार मावळते मुख्य सचिव सुमित मलिक यांच्याकडून स्विकारतील. डि.के.जैन हे भारतीय प्रशासन …

Read More »

आता प्रेक्षकच म्हणणार ‘Once मोअर’ लवकरच रसिकांच्या भेटीला चित्रपट येणार

मुंबई : प्रतिनिधी अनोख्या शीर्षकांच्या सिनेमांसाठी मराठीसृष्टी नेहमीच चर्चेत असते. एखाद्या साध्याशा शब्दाचा शीर्षकस्थानी ठेवून एखादी कथा सादर करण्यात मराठी दिग्दर्शकांचा हातखंडा असल्याचं जगभरातील सिनेरसिकांना ठाऊक आहेत. एका आगामी सिनेमाचं शीर्षकही याला अपवाद नाही. एखादा परफॅार्मन्स किंवा गोष्ट आवडल्यास की मुखातून आपोआप ‘वन्स मोअर’ हे शब्द बाहेर पडतात, पण आता …

Read More »

खासगी बस, ट्रॅव्हल्सवाल्यांनी जास्त पैसे घेतल्यास प्रवाशांनो तक्रार करा परिवहन विभागाचे प्रवाशांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने दि. २७ एप्रिल रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी वाहनांचे (खासगी बस, ट्रॅव्हल्स इ.) महत्तम भाडेदर निश्चित केले आहेत. हा शासन निर्णय त्वरीत प्रभावाने अमलात आला आहे. कंत्राटी बस परवाने धारकांकडून जर विहीत दरापेक्षा अधिक दराने आकारणी करण्यात येत असेल तर त्या विषयी मोटार वाहन विभागाच्या 022 …

Read More »

६१ वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘संत तुकाराम’च्या प्रयोगात माऊलींचा भव्य सत्कार गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार

मुंबई : प्रतिनिधी दादा महाराज मोरे माऊलींच्या ६१ वर्षपूर्तीच्या निमित्ताने संगीत ‘संत तुकाराम’ या नाटकाच्या मंचावर त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी बोलताना माऊलींनी आपले विचार प्रकट केले. या सोहळ्याला गृहमंत्र्यांसोबत किर्तनकार आत्माराम महाराज बडे उपस्थित होते. श्री वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्यामसुदर सोन्नर महाराज यांच्या प्रयत्नांनी या सत्कार सोहळ्याचं …

Read More »