Breaking News

१५ मे पासून साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करणार साथीच्या रोगावर विभागाने विशेष लक्ष देण्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने आतापासून तयारी सुरू करावी. तसेच विभागाने निम्नशहरी भागात विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी दिले. १५ मे पासून साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. स्वाईन फ्ल्यू प्रयोग शाळा नाशिकमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या …

Read More »

स्वानंदीने घेतली स्पृहाची जागा ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ नाटकामध्ये उमेश कामतसोबत दिसणार!

मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वीच आम्ही एक बातमी दिली होती. त्यात स्पृहा जोशी ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकातून बाहेर पडल्याचं म्हटलं होतं. पहिल्या प्रयोगापासून हे नाटक चांगलंच गाजतंय. ठिकठिकाणाहून प्रयोगाची मागणी वाढत आहे. पूर्वी केलेल्या काही कमिटमेंट्समुळे स्पृहाला नाटकाच्या प्रयोगांसाठी धावपळ करणं शक्य होत नसल्याने स्पृहाने ‘डोण्ट वरी बी …

Read More »

भिमा कोरेगाव दंगलीतील साक्षीदार पूजा सकट हिची आत्महत्या की हत्या ? सखोल चौकशीची प्रवक्ते महेश तपासे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव दंगलीतील मुख्य साक्षीदार असलेल्या पूजा सकट हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. भीमा कोरेगाव दंगलीमध्ये ज्या पूजा सकट हिच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. …

Read More »

नाणार प्रकल्पाच्या अधिसूचनेबाबत मुख्यमंत्री खरे की शिवसेनेचे उद्योगमंत्री ? रद्द करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे उद्योग मंत्र्यांचे वक्तव्य तर मुख्यमंत्री म्हणतात निर्णय घेवू

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्पासाठी भू-संपादनाची प्रक्रिया थांबविण्यासाठी याबाबतची अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी करत त्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे जाहीर केले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदरची अधिसूचना रद्द करण्याबाबतचे पत्र शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी दिल्याचे सांगत याबाबत योग्य निर्णय घेणार असल्याचे जाहीर …

Read More »

नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांचे आव्हान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्पावरून काल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केलेली टीका, त्यानंतर यासंदर्भातील जमिन भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्योग मंत्र्यांना अधिकार नसल्याचे जाहीर करणे या सर्व घडामोडींचे प्रतिसाद आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

Read More »

ऋषिकेश बनला वेडगावचा शहाणा ‘वाघेऱ्या‘ या अनोखा विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई : प्रतिनिधी गावरान भूमिकांमध्ये विनोदी रंग भरताना कुठेही लाल मातीचा सुगंध हरवू न देता त्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय देण्याचं कसब अंगी असलेल्या ऋषिकेश जोशीने आजवर साकारलेल्या सर्वच भूमिकांचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. प्रेक्षक जेव्हा एखाद्या कलाकाराला सिनेमातील नावाने ओळखू लागतो तेव्हा त्या कलावंताने साकारलेल्या भूमिकेचं चीज झालं असं म्हटलं …

Read More »

विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांना आवश्यक मनुष्यबळ द्या विकास मंडळांच्या आढावा बैठकीत राज्यपालांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून या मंडळांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत यासाठी नियोजन विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्यातील विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ, उर्वरित …

Read More »

खलनायकी भूमिकांकडून नायकी भूमिकांकडे… तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार गणेश यादव

मुंबई : प्रतिनिधी अभिनेते गणेश यादव यांनी आजवर जरी विविधांगी भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांनी साकारलेल्या खलनायकी ढंगातील भूमिकाच जास्त स्मरणात राहणाऱ्या ठरल्या आहेत. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या सिनेमातील भ्रष्ट राजकारणी असो, वा खाकी परिधान करूनही अन्यायाला साथ करणारा पोलिस अधिकारी असो… गणेशने नेहमीच आपल्या भूमिकांना …

Read More »

६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान ४ हजार ७७१ रिक्तपदांसाठीही मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध २५ जिल्ह्यांमधील ६५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ३३ जिल्ह्यांतील सुमारे २ हजार ८१२ ग्रामपंचायतींमधील ४ हजार ७७१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी  २७ मे २०१८ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाच्या प्रसिद्धिपत्राकात म्हटले आहे की, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी ७ ते १२ मे २०१८ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी १४ मे २०१८ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १६ मे २०१८ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. …

Read More »

पेट्रोल, डिझेलवरील अन्यायी कर कमी करून जीएसटीच्या कक्षेत आणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात इंधनावर सरकारने लावलेला अन्यायी कर कमी करावा व त्यावरील विविध अधिभार तात्काळ रद्द करून पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली. सध्या संपूर्ण देशपातळीवर महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलचे दर सर्वाधिक …

Read More »