Breaking News

उद्दीष्ट एकच, २०१९ ला भाजप आणि मित्र पक्षाला सत्तेवरून घालविणे साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मित्र लोकशाहीचे फोरमची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी मित्र लोकशाहीचे (Friends of Democracy) हा फोरम कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.  तरीही त्याचे प्रमुख उद्दिष्ट मात्र राजकीय आहे. म्हणजेच आज केंद्रात सत्तेत असणाऱ्या मनुवादी व लोकशाही विरोधी भाजपा व त्याच्या मित्र पक्षास २०१९ मधील निवडणुकीमध्ये सत्तेतून पायउतार करणे, हेच ह्या फोरमचे  प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. त्यासाठी …

Read More »

वादाची लागण ‘हिंदू कोड बील’ ला नाटक सादरीकरणाच्या हक्कावरून वाद

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकिय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात वादांना फार महत्व आहे. मात्र एखाद्या वादामुळे चांगली नाट्यकृतीच बंद होण्याची वेळ आली तर ते सामाजिकदृष्ट्या अतिशय घातक आहे. सध्या मराठी अनुवादीत हिंदू कोड बील या नाटकाच्या सादरीकरणाच्या हक्कावरून असाच वाद निर्माण झाला असून या वादाचा परिणाम या नाट्यकृतीवर होण्याची शक्यता …

Read More »

‘लगी तो छगी’साठी पुन्हा एकत्र आले शिवदर्शन-अभिजीत साबळेंचा नातू शिवदर्शन आणि शिवाजी साटमांचा मुलगा अभिजीत पुन्हा एकत्र

मुंबई  : प्रतिनिधी रियल लाईफमध्ये असो वा, रील लाईफमध्ये एखाद्याचे एखाद्याशी सूर जुळले की त्यांची चांगलीच गट्टी जमते. चंदेरी दुनियेतही असे काही दिग्दर्शक कलाकार आहेत त्यांचे सूर इतक्या चांगल्या प्रकारे जुळले आहेत की ते वारंवार एकत्र दिसतात. मराठी सिनेसृष्टीतही अशी बरीच उदाहरणं पाहायला मिळतात. शिवदर्शन साबळे आणि अभिजीत साटम हे …

Read More »

एकनाथ खडसेंना अडकविण्याची सुपारी भाजपच्याच ज्येष्ठ मंत्र्यांची सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांचा खळबळजनक आरोप

मुंबई : प्रतिनिधी जमिन घोटाळा आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबध असल्याच्या आरोपावरून मंत्री पदावरून पाय उतार झालेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अडकवण्यासाठी भाजपाच्याच एक ज्येष्ठ मंत्र्यांनी सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप अण्णा हजारे यांच्या कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी केला. एकनाथ खडसे यांना खोट्या केसेसमध्ये अडकाविण्यासाठी झालेल्या …

Read More »

शेतकरी कर्जमाफी योजनेत आता २००१ ते २००९ मधील थकित शेतकऱ्यांचा समावेश राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयानुसार १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत उचल केलेल्या पीक किंवा मध्यम मुदत कर्जाची ३० जून २०१६ रोजी थकित झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या मुद्दल व व्याजासह एकूण दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच इमूपालन, शेडनेट, पॉलीहाऊस यासाठी मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या थकित शेतकऱ्यांनाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून दिलासा देण्याचा महत्त्वाचा …

Read More »

राज्यातील कामगारांना आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि उपचार मिळणार राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कामगारांना अतिविशिष्ट वैद्यकीय उपचारांसह आधुनिक वैद्यकीय सुविधा सुलभतेने व परिणामकारकरित्या पुरविण्यासाठी राज्य कामगार विमा सोसायटीची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील कामगारांच्या आरोग्य सुरक्षेच्यादृष्टीने केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील राज्य कामगार विमा महामंडळ यांच्याकडून राज्य कामगार विमा योजना राज्यातील एकूण २२ जिल्ह्यांमध्ये ४३ …

Read More »

निर्वासितांना दिलेल्या जमिनी त्यांच्या मालकीच्या होणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासित नागरिकांना राज्यात देण्यात आलेल्या जमिनी व मालमत्ता  हस्तांतरण व वापर यावरील निर्बंधातून मुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. अशा निर्वासित नागरिकांना देण्यात आलेल्या भूखंडांच्या नोंदणीवर अ-१ सत्ता प्रकार अथवा भोगवटादार वर्ग-१ अशी नोंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या जमिनींचे मालक हे …

Read More »

राज्य सरकारमुळे नाणारचा तमाशा झालाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार येथील रिफायनरीच्या प्रकल्पावरून सध्या सुरु असलेला गोंधळ हा आतून किर्तन बाहेरून तमाशा झाला असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी करत या गोंधळाला सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्याचे उद्योग मंत्री असलेले सुभाष देसाईं हे जाहीर सभेत सांगतात कि अधिसूचना …

Read More »

१५ मे पासून साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करणार साथीच्या रोगावर विभागाने विशेष लक्ष देण्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने आतापासून तयारी सुरू करावी. तसेच विभागाने निम्नशहरी भागात विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी दिले. १५ मे पासून साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. स्वाईन फ्ल्यू प्रयोग शाळा नाशिकमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या …

Read More »

स्वानंदीने घेतली स्पृहाची जागा ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ नाटकामध्ये उमेश कामतसोबत दिसणार!

मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वीच आम्ही एक बातमी दिली होती. त्यात स्पृहा जोशी ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकातून बाहेर पडल्याचं म्हटलं होतं. पहिल्या प्रयोगापासून हे नाटक चांगलंच गाजतंय. ठिकठिकाणाहून प्रयोगाची मागणी वाढत आहे. पूर्वी केलेल्या काही कमिटमेंट्समुळे स्पृहाला नाटकाच्या प्रयोगांसाठी धावपळ करणं शक्य होत नसल्याने स्पृहाने ‘डोण्ट वरी बी …

Read More »