Breaking News

कोण घेणार स्पृहाची जागा? ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ नाटकात नवी अभिनेत्री पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी काही मालिकांमध्ये काळानुरूप बदल होत असल्याचं आपण नेहमीच पाहात आलो आहोत. नाटकही याला अपवाद नाही. एखाद्या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारणारा कलावंत दुसऱ्या एखाद्या कामात गुंतला की त्याची जागा अन्य एखादा कलावंत घेतो आणि ‘शो मस्ट गो ऑन’ असं म्हणत नव्या टिमसोबत नाटकाची वाटचाल पुढे सुरूच राहते. चित्रपटांपासून …

Read More »

आदीवासी जमिन विक्रीच्या मान्यतेचे अधिकार आम्हाला द्या मंत्र्यांच्या बैठकीत महसूल विभागीय आयुक्तांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आदीवासी समाजाच्या शेत जमिनी विक्रीस मान्यता देण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असले तरी सुज्ञ नागरीकांकडून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत फसवणूक करत त्यांच्या जमिनी बळकाविण्याचे प्रकार सर्रास घडताना दिसून येतात. तरीही आदीवासींच्या जमिन खरेदीस मान्यता देण्याचे अधिकार विभागीय स्तरावर देण्याची मागणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महसूल …

Read More »

एव्हरेस्ट सर करायला निघाले १० जिगरबाज आदीवासी विद्यार्थी आदीवासी मंत्री विष्णू सवरा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शुभेच्छा सोहळा

चंद्रपूर : प्रतिनिधी कठोर परिश्रमाला यशाचा सुंगध असतो आणि उपजत गुणवत्तेला संधी मिळाली की आकाश मोकळे होते,  हा संदेश देणारा एक हृदयस्पर्शी सोहळा चंद्रपूरच्या जनतेने आज अनुभवला. जिल्हयातील आदिवासी शाळेतील १० विद्यार्थ्यांनी वर्षभर चाललेल्या खडतर आणि कठीण प्रशिक्षणानंतर एव्हरेस्ट सर करण्याचा संकल्प सोडला. हे १० विद्यार्थी १० एप्रिलपासून हिमालयाच्या पायथ्यापासून एव्हरेस्ट सर करायला …

Read More »

मोदी सरकारच्या कारभारा विरोधात काँग्रेसचे एक दिवसीय उपोषण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिके आणि कारभारामुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कारभाराच्या निषेधार्थ आणि देशात शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे उद्या ९ एप्रिल रोजी राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र …

Read More »

धनगर आरक्षण पेटण्याची शक्यता? रासप आणि राज्य सरकारबाबत धनगर ऐक्य परिषदेत भूमिका ठरणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यास आता साडेतीन वर्षे झाली. त्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झाली करण्यात आली नाही. यापार्श्वभूमीवर येत्या २२ एप्रिलला सांगलीत धनगर ऐक्य परिषदेने समाजाचा महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्यात धनगर …

Read More »

तुमची औकात तरी आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची सरकारवर टीका

सातारा- दहिवडी : प्रतिनिधी नुकत्याच मुंबईत झालेल्या भाजपच्या महामेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका करत चहावाल्यांच्या नादीला लागाल तर तुम्ही औषधालाही शिल्लक राहणार नसल्याची टीका केली. त्या टीकेचा खरपूस समाचार घेत पवार साहेबांचे बोट पकडून यांचे गुरु राजकारणात आले आणि हे भाजपचे …

Read More »

भाजप-सेनेच्या लोकांच्या डोक्यात कुठं पाणी भरतंय तेच कळेना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

सोलापूर-टेंभुर्णी : प्रतिनिधी सगळी सोंगं करता येतात परंतु पाण्याचं आणि पैशाचं सोंग करता येत नाही परंतु भाजप-सेनेच्या लोकांचं डोकं कुठे पाणी भरतंय तेच कळत नाहीय अशा शब्दात अजित पवारांनी टेंभुर्णीच्या जाहीर सभेत सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. धरणात पाणी भरलेलं असतानाही शेतकऱ्यांना पाणी देत नाहीय. वीज कनेक्शन तोडण्याचे काम करत …

Read More »

‘जश्न-ए-हुस्न’ उलगडणार सौंदर्याचं मर्म राणी वर्मांच्या संकल्पनेतील अनोखा कलाविष्कार

मुंबई : प्रतिनिधी कला आणि सौंदर्य यांचे एकमेकांशी अतूट नाते आहे. सौंदर्याचा आविष्कार म्हणूनच कलेकडे पहावे लागेल. रसिकतेने ते सौंदर्य अनुभवत कलेच्या आगळ्या आविष्काराचा आनंद ‘जश्न-ए-हुस्न’ या सांगीतिक कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळणार आहे. संगीत आणि नृत्याच्या माध्यमातूनच तिचा साजशृंगार, तिचं सौंदर्य याची ओळख करून देण्याचा प्रयत्न झाला तर तो रसिक मनावर …

Read More »

कान्सवारीवर वीणाचा ‘खरवस’ मराठी लघुपटही कान्सवारीला

मुंबई : प्रतिनिधी ‘वळू’, ‘गाभ्रीचा पाऊस’, ‘लालबाग परळ’, ‘जन्म’, ‘टपाल’, ‘बायोस्कोप’ यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री वीणा जामकर ‘लालबागची राणी’ या सिनेमानंतर सिनेसृष्टीतून जणू लुप्तच झाली. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लालबागची राणी’नंतर वीणा आणखी एखाद्या आव्हानात्मक भूमिकेत दिसेल अशी आशा होती, पण तसं काहीच झालं नाही. या …

Read More »

भिडे-एकबोटे : महिला कार्यकर्त्यांना सोशल मिडीयावर शिव्यांची लाखोली सावळे आणि अंधारे यांना पोलिस संरक्षण देण्याची भीम आर्मीची मागणी

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव येथील दलित हिंसाचाराच्या प्रकरणी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच त्याचा पाठ पुरावा करत असल्याने याप्रकरणातील तक्रारकर्त्या आणि दलित कार्यकर्त्या अनिता सावळे आणि सामाजिक विषयांना वाचा फोडणाऱ्या प्रा. सुषमा अंधारे यांच्या विरोधात सोशल मिडीयावर सध्या ट्रोलिंग …

Read More »