Breaking News

भिडेच्या अटकेसाठी दलित, मराठा, मुस्लिम समाज आझाद मैदानावर हजारोंच्या उपस्थितीत एल्गार आंदोलनाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगांव येथील हल्ल्याप्रकरणातील सुत्रधार असलेल्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेला अटक करण्याच्या मागणीवरून पुकारण्यात आलेल्या एल्गार आंदोलनाला आझाद मैदानावर सुरुवात झाली. या आंदोलनात दलित समाजाबरोबरच मराठा, मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनीही सहभागी घेतला असून हजारोंच्या संख्येने आंदोलक आझाद मैदानावर जमा होत आहेत. या आंदोलनासाठी मुंबई शहर, उपनगराबरोबरच विदर्भातील …

Read More »

सिनेट निवडणुकीत मतदारांना माहिती देण्यात मुंबई विद्यापीठ उदासीन मतदानाची माहितीच मतदारांना कळविली नसल्याचा अनिल गलगलींचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक होती पण पहिल्यांदाच असे घडले की पदवीधर मतदारांना मुंबई विद्यापीठाने साद घातली नाही.मतदान कोठे आहे याची माहितीचे पत्र पाठविले नाही ना मतदार झाले असल्याचे पत्र पाठविले. मुंबई विद्यापीठ याबाबतीत उदासीन असल्याची खंत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे. गलगली यांनी घाटकोपर …

Read More »

एल्गार मोर्चाला संभाजी ब्रिगेडचा पाठींबा पूर्ण ताकदीनिशी मोर्चात सहभागी होणार

पुणे : प्रतिनिधी भिमा कोरेगांव येथील दलित समाजावर झालेल्या हल्ल्याच्या पाठीमागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हेच आहेत. संभाजी भिडे यास अटक करण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी सोमवारी २६ मार्च रोजी काढण्यात येत असलेल्या एल्गार मोर्चास संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा देत यात सहभागी होणार असल्याची माहिती संभाजी …

Read More »

इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासाठी राज्य सरकारचा शब्दकोश भाषा संचालनालयाचा शासन शब्दकोश ॲप आता मोबाईल उपलब्ध

मुंबई : प्रतिनिधी शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा. रोजच्या व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ आणि मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ सहज उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत येणाऱ्या भाषा संचालनालयाने शासन शब्दकोश ॲप तयार केले आहे. शासन शब्दकोश भाग – एक असे या मोबाईल अ‍ॅपला नाव देण्यात आले असून, यात …

Read More »

पोलिस म्हणतात भिडेंच्या अटकेसाठी एल्गार मोर्चा नको, तर आंदोलन करा पोलिसांनी परवानगी नाकारल्याची अँड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगांव येथे विजयी स्तंभास मानवंदना देण्यासाठी गेलेल्या दलितांवर काही समाजकंटकांनी हल्ल्या केल्याच्या घटनेतील मुख्य सुत्रधार असलेल्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी दलित समाजाच्या विविध संघटनांकडून एल्गार मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र त्या मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारत मोर्चा नाही तर आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी …

Read More »

प्लास्टीक आणि थर्माकोलवर कायदेशीर बंदी राज्यात अधिसूचना लागू करण्यात आल्याची पर्यावरण मंत्री रामदास कदम घोषणा

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक व थर्माकोल बंदी बाबतची अधिसूचना लागू करण्यात आली असून त्याची विक्री व वापर करणाऱ्यांवर कायदेशीर करण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम  मंत्रालयात केली. राज्यातून १८०० टन प्लास्टिक कचरा रोज निर्माण होतो. लाखो टन कचरा रस्त्याच्या आजुबाजूला दिसतो. त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत …

Read More »

आठवले म्हणतात जर संभाजी भिडे जबाबदार असेल तरच अटक करा भिडे अटकेवरून दलित नेत्यांमध्ये परस्पर विरोधी भूमिका

मुंबई : प्रतिनिधी १ जानेवारी रोजी भिमा कोरेगाव येथे झालेल्या दलितांवरील हल्ल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे याबरोबर संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यास अटक करण्याच्या मागणीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा.जोगेंद्र कवाडे आग्रही आहेत. त्यासाठी कवाडे यांच्या पक्षाच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानावर आज मोर्चा काढण्यात आला. …

Read More »

अँट्रॉसिटी निकालाच्या पुर्नविचारासाठी रिपाई सर्वोच्च न्यायालयात जाणार केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी अँट्रॉसिटीच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा कायद्याचा अवमान करणारा निर्णय आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) च्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी …

Read More »

विनोदाचे तीन एक्के प्रथमच दिसणार एकत्र नयना आपटे बनल्या दिनूच्या सासूबाई

मुंबई : प्रतिनिधी ‘जुनं ते सोनं’ म्हणत इतिहासजमा झालेली बरीच नाटकं आज नवं साज लेवून रंगभूमीवर येत आहेत. सुनिल बर्वेंच्या ‘हर्बेरियम’ने केलेली जुन्या नाटकांसाठी केलेली नवी पहाट बऱ्याच गाजलेल्या नाटकांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे. याच धर्तीवर जवळजवळ चार दशकं रंगभूमीवर गाजलेलं बबन प्रभू यांचं ‘दिनूच्या सासुबाई राधाबाई’ हे नाटकही नव्या …

Read More »

पात्र मागासवर्गीयांच्या सहकारी संस्थांना सरकारी अनुदान देणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या प्रलंबित असलेल्या ४४९ औद्योगिक सहकारी संस्थांची एका महिन्यात छाननी करून पात्र, सक्षम असलेल्या संस्थांना येत्या तीन महिन्यात निधी वितरीत केला जाणार आहे. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीत अनावश्यक  असलेल्या बावीस अटींचे परिपत्रक काढणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्याची …

Read More »