Breaking News

मेस्मा कायदा लागू करण्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न : विधानसभेचे कामकाज बंद पाडले

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत सकाळी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच शिवसेनेचे आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेला मेस्मा कायदा रद्द करण्याच्या मागणीवरून जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर सभागृहात मेस्मा कायदा रद्द करण्याबाबतचा फलकही फडकाविला. शिवसेना आमदारांमुळे सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने अखेर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब …

Read More »

डॉक्टर्स देणार नसाल तर समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावण्यास वेळ द्या एकनाथ खडसेंची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर आगपाखड

मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक अधिवेशनात आरोग्याच्या मुद्यावर  प्रश्न मांडून झाले आहेत ,मात्र दवाखान्यात डॉक्टर्सच्या जागा भरल्या जात नाहीत. जर डॉक्टर्स उपलब्ध नसतील तर सरकारने समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावण्यासाठी वेळ तरी द्या असा संताप भाजपचे आमदार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी करत ड़ॉक्टरांची नियुक्तीचे कामही आता वैद्यकीय विभागाकडे वर्ग केल्याचे सांगण्यात येत असून …

Read More »

‘आपण फकस्त लढायचं…’ म्हणत येतोय ‘फर्जंद’ शिवकालीन चित्रपटाचे लवकरच आगमन

मुंबई : संजय घावरे ‘आपण फकस्त लडायचं, आपल्या राजांसाठी… आन् स्वराज्यासाठी…!’ या एकाच ध्येयाने हजारो हात स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांच्या मदतीला आले होते. ‘रयतेचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती वेगळी सांगण्याची गरज नाही. मात्र महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी अनेकांनी मोलाचे योगदान दिले आहे. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी ‘कोंडाजी फर्जंद’ …

Read More »

असंघटीत कामगारांसाठी ३१ मार्च पर्यंत कामगार सुरक्षा मंडळ स्थापणार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सल्लागार समिती गठीत करण्याचे कामगार मंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३ कोटी ६५ हजार असंघटीत कामगारांसाठी ३१ मार्च पर्यंत कामगार सुरक्षा मंडळ स्थापन केले जाणार आहे. या मंडळांतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही सल्लागार समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत शिवसेनेचे सदस्य सुनिल प्रभू, सुनिल राऊत, अशोक पाटील, …

Read More »

आता पालकांनाही फी वाढीच्या विरोधात तक्रार करता येणार येत्या शैक्षणिक वर्षापासून शुल्क नियंत्रण समिती कार्यान्वित करण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी खासगी शाळांनी अवैधपणे फी वाढवली तर येत्या शैक्षणिक वर्षापासून फी वाढीच्या विरोधात पालकांना तक्रार करण्याचा अधिकार राहणार आहे. त्यासाठी शुल्क नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. तक्रारीची दखल घेवून खासगी शाळांवर कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत मुंबईतील …

Read More »

रेल्वे अॅप्रेंटिस आंदोलनावरील लाठीमाराची चौकशी करा विधानसभेत विखे-पाटील तर विधान परिषदेत धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबई :प्रतिनिधी रेल्वेमधील अॅप्रेंटिसच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत करत रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्यानेच बेरोजगारांना रोज आंदोलने करावी लागत असल्याची टीका केली. तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हे सरकारचे अपयश असल्याची टीका करीत या विषयावर सरकारने …

Read More »

पुर्नवसित इमारतींतील रहिवाशांच्या माहितीचे डिजिटायझेशन करणार घुसखोरीला पायबंद घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील नाले, रस्ते व अन्य विकास प्रकल्पांमुळे बाधित होणार्‍या झोपडीधारकांसाठी चेंबुरच्या माहुल परिसरात उभारण्यात आलेल्या ४६ इमारतींमधील २०० घरांची विक्री झाल्याचा  प्रश्न शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित केला. याप्रकरणी  कारवाईची मागणी केली असता. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा घटना घडू नयेत …

Read More »

रेल्वेत समाविष्ट करण्यासाठी प्रशिक्षणार्थींचा रेल रोको आंदोलक विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये एकजण जखमी

मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक महिन्यापासून रेल्वेच्या विविध विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असूनही नोकरीत समाविष्ट केले जात नसल्याने आज सकाळी अचानक माटुंगा ते दादर दरम्यान प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी रेल रोको आंदोलन सुरु केले. त्यामुळे उपनगरातून सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांवर मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाल. तसेच पोलिसांनी आंदोलनकांना हटविण्यासाठी केलेल्या लाठीचार्ज मध्ये …

Read More »

आता अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे सेविकांना १ हजार ५०० रुपये मानधन वाढ देण्याची महिला व बाल कल्याण मंत्री मुंडे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनि अंगणवाडी सेविका यांच्या निवृत्तीचे वय ६० वरुन ६५ करण्यात येणार असल्याची माहिती तसेच १ हजार ५०० रुपयांची मानधनवाढ आणि सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. मंत्री मुंडे …

Read More »

दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करणार एक महिन्यात निर्णय घेणार असल्याची सामाजिक न्यायमंत्री बडोलेचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना  ९०० रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय येत्या महिनाभरात घेण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधान परिषदेत दिले. यासंबंधीचा तारांकित प्रश्न डॉ. अपूर्व हिरे, …

Read More »