Breaking News

जनावरांच्या लसप्रश्नी विरोधकांचा सभात्याग पदुम मंत्री महादेव जानकर असमाधानकारक उत्तर दिल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील २कोटी १० लाख शेतीपयोगी जनावरांना लाळ-खुरकूत रोग होवू नये यासाठी लस देण्यासाठी राज्य सरकार चालढकल करत आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून याप्रश्नी पशु व दुग्ध संवर्धन मंत्री महादेव जानकर हे प्रश्नांशी संबधित नसलेली उत्तर देत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी करत सभात्याग …

Read More »

बदनामी झाल्याने एकनाथ खडसे यांची पुन्हा सरकारवर आगपाखड तर आमदारांवर आरोप करणाऱ्यांची चौकशी करण्याची आमदार हितेंद्र ठाकूर यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी २५ ते ३० वर्षाच्या काळात सभागृहाचा सदस्य असताना एकही आरोप झाले नाहीत. मात्र मंत्री पदावर बसल्यावर माझ्यावर वारेमाप आरोप करण्यात आले. त्या आरोपांची अँण्टी करप्शन, सीआयडी, लोकायुक्त मार्फत चौकशी केली. मात्र त्यातील माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही. जनतेसमोर नाथाभाऊ कसा नालायक आहे हे भासवण्याचा खोडसाळ आरोप …

Read More »

नियम बाह्य पध्दतीने कामकाज होतय? तपासून सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव यांच्या आरोपावर अध्यक्ष बागडे यांचे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी एक मार्च रोजी तारांकित प्रश्न सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली नव्हती. मात्र त्यावेळची प्रश्नोत्तरे आज सभागृहाच्या पटलावर ठेवलीत. मग काल सोमवारी उद्योगमंत्र्यांनी एक मार्च रोजीच्या तारांकित प्रश्नामधील न झालेल्या प्रश्नाबद्दल खुलासा करणे कितपत योग्य असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना करत सभागृहाचे …

Read More »

प्रशांत परिचारक यांच्या बडतर्फीच्या मुद्यावरून शिवसेनेचा सभात्याग सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेतील भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले. मात्र परिचारक यांच्या आमदारकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीवरून विधानसभेत सभात्याग केला. विधानसभेचे कामकाज सकाळी सुरु झाल्यानंतर प्रशांत परिचारक यांची …

Read More »

प्लास्टिक थर्माकोलपासून बनविलेल्या प्लेटस्‌, ताट, वाट्या लवकरच बंद बंदीसंदर्भातील अधिसूचना काढणार असल्याची पर्यावरण मंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात संपूर्ण प्लास्टिक व थर्माकोल बंदी संदर्भात प्रारुप अधिसूचनेचा आराखडा तयार करण्यात आला असून तो शासनाच्या राजपत्रात लवकरच प्रसिद्ध केला जाईल असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. ते आज मंत्रालयात प्लास्टिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. पर्यावरण मंत्री कदम म्हणाले की, महाराष्ट्रात प्रतीदिन १८०० टन प्लास्टिक कचरा निर्माण …

Read More »

छगन भुजबळांच्या प्रकृतीबद्दल विधानपरिषदेत चिंता खाजगी रूग्णालयात उपचार करण्यास परवानगी देण्याची विरोधकांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना खाजगी रूग्णालयात उपचार करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आणि सहकारी पक्षाच्या सदस्यांनी सोमवारी विधान परिषदेत लावून धरली. आमदार कपिल पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीचा मुद्दा मांडला. भुजबळ आताही आमदार …

Read More »

कपिल पाटील स्वत:ला कोण समजतो? चंद्रकांत पाटीलांचा संतप्त सवाल प्रशांत परीचारक यांच्यावरून विधान परिषदेत गदारोळ : कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई : प्रतिनिधी परिचारक यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सभागृहात बोलावणे ही घातक परंपरा सुरू होर्इल. त्यांनी जे शब्द प्रयोग केले ती परंपरा या देशामध्ये ज्यांची आहे ते सत्तेवर असतील तर हा प्रश्न अधिक गंभीर बनतो. त्यांच्या प्रस्तावाला अहवालाच्या माध्यमातून त्यांना परत बोलावण्याची संमती कोणी दिली हे समजले पाहिजे. …

Read More »

राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर १२ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून निवडून देण्यासाठीच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी या महिन्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकींतर्गत दिनांक १२ मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येतील, तर २३ मार्च २०१८ रोजी मतदान घेण्यात येणार असल्याबाबत निवडणुकीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने आज प्रसिद्धीस दिली आहे. उमेदवार किंवा त्याच्या सूचकाला उमेदवारासाठीची नामनिर्देशनपत्रे कक्ष क्र. १, तळमजला,  विधानभवन, मुंबई येथे १२ मार्च २०१८ पर्यंत सार्वजनिक …

Read More »

नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत आपलं पॅनलची सरशी? मुंबई शाखेत प्रसाद कांबळी यांच्या गळ्यात सर्वाधिक मतांची माळ

मुंबई : प्रतिनिधी मागील बऱ्याच दिवसांपासून गाजत असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक काल ठरलेल्या दिवशी निर्विघ्नपणे पार पडली. तळागाळापर्यन्त जाऊन प्रचार करूनही २०१८-२३ या कालावधीसाठी झालेल्या या निवडणुकीत मतदारांच्या उदासीनतेमुळे केवळ ३० टक्केच मतदान झाले. यात दिवंगत अभिनेते मछिंद्र कांबळी यांचे पुत्र प्रसाद कांबळी यांना मुंबई मध्यवर्ती शाखेतून सर्वाधिक मते …

Read More »

अँड ऑस्कर गोज टू ‘शेप ऑफ वॉटर’ शशी कपूर व श्रीदेवी यांना हॉलीवूडची श्रद्धांजली

लॉस एंजिल्स : प्रतिनिधी हॉलीवुड-बॉलीवुड सोबतच  जगभरातील सिनेचाहत्यांचे लक्ष वेधुन घेणारा ९० वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज मोठ्या दिमाखात पर पडला. लॉस एंजिल्समधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये ‘शेप ऑफ वॉटर’ या बहुचर्चित चित्रपटाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी दिला जाणारा ऑस्कर आपल्या नावे केला. रेंगीबेरंगी आणि फॅशनेबल कॉस्ट्यूम परिधान करून …

Read More »