Breaking News

‘वेगे वेगे धावू…’ला लाभला शंकर महोदवन यांचा स्वर बालपण उघडून दाखविणारे लहान मुलांसाठी खास गाणं

मुंबई : प्रतिनिधी छोट्यांच्या विश्वात डोकावून पहिलं तर त्या चिमुकल्या मनात विचारांची किती उलथापालथ चाललेली असते हे नक्की कळू शकेल. मुलांच्या विश्वात रमताना आपणही लहान होतो. छोट्यांच्या दुनियेत घेऊन जात त्यांच्या मनातील विश्व, गायक–संगीतकार शंकर महादेवन उलगडून दाखवणार आहेत. मुलांशी संवाद साधत त्यांच्या बालविश्वात घेऊन जाणारं सुमधुर गीत नुकतंच शंकर …

Read More »

मंत्री चेंबरमध्ये बसून अंडी उबवतात का? अजित पवार यांचा मंत्र्यांना उपरोधिक टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्वाची चर्चा सुरु असताना विधानसभेत एकही मंत्री उपस्थित नाही. याचा अर्थ सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नी गंभीर नसल्याचे दिसून येत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी करत सभागृहात बसायचे सोडून मंत्री आपल्या चेंबरमध्ये बसून काय अंडी उबवतात का? असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करू नका राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांची मागणी : विरोधकांचा सभात्याग

मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक बांधले जाणार आहे. त्याच्या निविदा ही आता निघाल्या आहेत. मात्र आम्ही सरकारमध्ये असताना जगात सर्वात उंच पुतळा या स्मारकात बांधण्याचा निर्णय घेतला होता. पण आताच्या सरकारने पुतळ्याची उंची ११२ फुटाने कमी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील …

Read More »

अखेर गरीबांना रेशनवर मिळणारी साखर बंद केंद्रानेच गरीबांची साखर नाकारल्याचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट यांचा खुलासा

मुंबई : बी.निलेश ‘सबका साथ सबका विकास’ चा नारा देत विकासाच्या घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रेशन दुकानावर मिळणारी गरीबांची साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्य सरकारने रेशनवर द्रारीद्रय रेषेखालील लोकांना पुन्हा साखर मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवला पण तोही फेटाळून लावल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा …

Read More »

वित्त विभागाने पैसे न दिल्याने बालकांना आणि महिलांना पोषण आहार नाही महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती : विरोधकांचा सभात्याग

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडीतील बालकांना आणि गर्भवती महिलांना पोषण आहार दिला जातो. मात्र राज्याच्या वित्त विभागाने पुरेसे पैसे दिले नसल्याने मागील काही दिवसांपासून पोषण आहार बंद करण्यात आल्याची धक्कादायक माहिती महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. परंतु आता पुरवणी मागण्यांमध्ये ४०० कोटी रूपये मागण्यात आले. मात्र …

Read More »

वीज चोरीच्या आदेशाबाबत औरंगाबाद पोलिस अनभिज्ञ गृहविभागाच्या आदेशाबाबत पोलिस आयुक्त आणि पोलिस अधिक्षकांना माहितीच नाही

औरंगाबाद : प्रतिनिधी वीज चोरी संदर्भात प्रथम खबरी अहवाल देण्याकरता औरंगाबाद जिल्ह्यातील ५पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील सिडको आणि छावणी तर ग्रामीण भागातील चिकलठाणा, गंगापूर आणि सिल्लोड या तालुक्यांचा समावेश आहे. हे आदेश गृृह विभागाने २८ फेब्रूवारीला जारी केले आहेत. याबाबत पोलिस आयुक्त यशस्वी यादव आणि पोलिस …

Read More »

जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात बदली चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : प्रतिनिधी जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांची थेट मुख्यमंत्री कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी आणि प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. डिग्गीकर यांच्यासाठी नवीन पद निर्माण करण्यात आले असून त्यांच्यावर विशेष प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी चार सनदी …

Read More »

कर्जमाफीच्या लाभार्थींची यादी सभागृहात ठेवणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने आतापर्यंत ३७ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असून शक्य झाले तर या सर्व शेतकऱ्यांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल, अशी ग्वाही सभागृहाचे नेते व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे अभिनंदन करणाऱ्या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. २००८-०९ मध्ये …

Read More »

अखेर आमदार परिचारक यांना विधान परिषदेत येण्यास प्रवेशबंदी शिवसेनेसह विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याला यश

मुंबई: प्रतिनिधी सैनिकांच्या पत्नींच्या संदर्भात अपशब्द काढणारे अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याची कारवाई रद्द करण्याच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नाला यश आले असून परिचारक यांना तूर्तास विधान परिषदेच्या सभागृहात येण्यास बंदी घालण्यात आल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी …

Read More »

सातवा वेतन आयोगामुळे २१ हजार कोटींचा अतिरिक्त भार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी, निमशासकीय व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असून या आयोगाच्या अंमलबजावणीमुळे शासकीय तिजोरीवर दरवर्षी २१ हजार ५३० कोटींचा अतिरिक्त भार पडेल, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कपिल पाटील, नरेंद्र पाटील आदी सदस्यांनी उपस्थित …

Read More »