Breaking News

‘दादा – बाबा’चा एकाच गाडीतून प्रवास… राजकिय विरोधक असूनही एकाच गाडीतून प्रवास

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार क्वचितच एकत्र दिसतात. त्यातच पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील सिंचनाची श्वेतपत्रिका काढत त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांची चांगलीच अडचण केली. त्यामुळे त्यांच्यात चांगलेच राजकिय शत्रुत्व निर्माण झाले होते. मात्र अजितदादा आणि पृथ्वीराज बाबा यांनी आज …

Read More »

राज्यपालांच्या भाषण अनुवाद वाचनाचे १० हजार कोणाला? श्रीपाद केळकर कि शिक्षण मंत्री तावडे यांना

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल सी.विद्यासागर यांच्या अभिभाषण होते. या अभिभाषणाचा अनुवाद वाचण्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तीला पाचारण करून त्याच्या तोंडून अनुवादीत भाग वाचला जातो. मात्र राज्यपालांचे अनुवादीत अभिभाषण वाचण्यासाठी बोलविण्यात आलेल्या श्रीराम केळकर ऐवजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी वाचन केल्याने अनुवाद वाचणाऱ्या …

Read More »

कर्जावरील व्याज भरण्यासाठी २१०० कोटींची पुरवणी मागण्यात तरतूद अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ हजार ८७१ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर

मुंबई: प्रतिनिधी राज्यावरील वाढता कर्जाचा डोंगर, महसूली उत्पन्नातील कमतरता आणि शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी रक्कम उभी करता राज्य सरकारला चांगलेच नाकी नऊ आलेले आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच थकीत कर्जावरील २ हजार १२९ कोटी रूपयांची व्याजाची रक्कम भरण्यासह इतर काही विभागांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या …

Read More »

श्रीदेवी यांचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात? शवविच्छेदनात अपघाती मृत्यूची नोंद : ‘चांदणी’ला शेवटचा निरोप देण्यासाठी सेलिब्रिटीजची गर्दी

मुंबई: प्रतिनिधी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी दुबईहून धडकली आणि बॅालिवुडसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांना जणू ‘सदमा’च बसला. श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे काल दिवसभर आणि आज दुपारपर्यंत सांगितले जात होते; परंतु शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये त्यांचा मृत्यू अपघाती झाल्याचे नोंद करण्यात आले आहे. त्यामुळे श्रीदेवी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे यावर …

Read More »

मे २०१८ पर्यंत १५ हजार गावे दुष्काळ मुक्त करणार राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून आगामी मे २०१८ पर्यंत राज्यातील आणखी १५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचा दावा राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसमोर अभिभाषण करताना …

Read More »

आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाची माफी मागितली राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठीत अनुवाद न वाचल्याने विरोधकांची टीका

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या प्रथेप्रमाणे राज्यपालांचे इतर भाषेत असलेल्या भाषणाचा मराठीत अनुवाद वाचून दाखविण्यात येतो. मात्र यंदा पहिल्यांदाच राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद वाचण्यास अनुवादक नसल्याने राज्य सरकारवर नामुष्की ओढावली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे ही बाब गंभीर असल्याचे सांगत सभागृहाची माफी …

Read More »

राज्य सरकारच्या निषेधार्थ राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल सी.विद्यासागर यांच्या अभिभाषणा दरम्यान राज्य सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ विरोधकांनी घोषणाबाजी केली. तसेच हे सरकार घोषणांच्या नावाखाली जनतेला गाजर देत असून सरकारवर निष्क्रीयतेचा आरोप करत विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला. विधिमंडळ अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे राज्यपालांचे अभिभाषण दोन्ही सभागृहाच्या संयुक्त सभागृहाच्या सदस्यांसमोर होत असते. …

Read More »

विरोधकांच्या सवालाला मुख्यमंत्र्यांचा जवाब अर्थसंकल्पिय अधिवेशनासाठी राज्य सरकार तयार

मुंबई : प्रतिनिधी राज्याला आर्थिक दिशा देणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन उद्या सोमवार पासून सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत विरोधकांनी वारेमाप आरोप केले. राज्य सरकारच्यावतीने  विरोधकांच्या आरोप वजा सवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवाब देत आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मलबार हिल येथील  सह्याद्री अतिथीगृहात सत्ताधाऱ्यांच्या …

Read More »

राज्य सरकारचे कांऊट डाऊन बिगिन्स सरकारला सत्तेची मस्ती आल्याचा विरोधकांचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजप-शिवसेनेला सत्तेची मस्ती आली असून ही मस्ती महाराष्ट्रातील जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही. सरकारला मस्ती आल्यानेच राज्यात मँग्नेटीकचे नव्हे तर फर्स्टट्रेड अर्थात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले असून धड सरकारी धर्म ना पाळला ना शेतकरी धर्म पाळला असल्याची टीका विरोधकांनी करत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त राज्य सरकारच्यावतीने आयोजित केलेल्या …

Read More »

चांदनी गर्ल श्रीदेवीची पडद्यावरून एक्झीट हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन

मुंबई : प्रतिनिधी आपल्या अभिनयाच्या आणि लावण्याच्या जोरावर हिंदी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आणि पहिली सुपरस्टार अभिनेत्री म्हणून नावाजलेल्या श्री अम्मा यंगर अय्यपन अर्थात श्रीदेवीचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झाले. पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी सोबत नातेवाईकांच्या लग्नासाठी दुबईत गेली असता रात्री उशीरा श्रीदेवीला हृदयविकाराचा झटका आला …

Read More »