Breaking News

विमा क्षेत्रातील धोरणाबाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी देशात सर्वाधिक ५० टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात असून नवीन धोरणामुळे ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी असून या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आपण लक्ष घालणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मँग्नेटीक महाराष्ट्र-२०१८ मधील परकीय गुंतवणूकदारांच्या राऊंड टेबल चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. …

Read More »

होय, आम्ही शिवस्मारकाच्या कामाला गती देण्यास कमी पडलो छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांची कबुली

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक निर्माण करण्याची घोषणा आम्ही केली. तसेच या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र भूमिपूजन होवून एक वर्ष झाला तरी या शिवस्मारकाच्या कामास गती देण्यास आम्ही कमी पडल्याची स्पष्ट कबुली भाजप सरकारमधील घटक …

Read More »

रणवीरची नायिका सारा कि जान्हवी? सिंम्बा चित्रपटात वर्णी लावण्यासाठी दोन अभिनेत्रींमध्ये शर्यत

मुंबई : प्रतिनिधी आज रणवीर सिंह हे नाव सर्वांनाच चांगलं परिचयाचं आहे. आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर रणवीरने स्वत:ला सिद्ध केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’मध्ये रणवीरचं एक अनोखं रूपच प्रेक्षकांना पाहायला मिळालं. रणवीरच्या या रूपावरही अनेक तरुणी फिदा झाल्या. सध्या झोया अख्तरच्या ‘गली बॅाय’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात …

Read More »

जगप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ.गोयल यांचे निधन वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा

मुंबई :प्रतिनिधी  जगप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी.के गोयल यांचे आज सकाळी हृदयविकरणे निधन झाले.  वयाच्या ८२ व्या वर्षी डॉ. गोयल यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांना घरी असतानाच हृदय विकाराचा झटका आला. ब्रीच कॅंडी रुग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. सेलिब्रिटिपासून ते गोरगरीब रुग्णापर्यंत सर्वांनाच आधार वाटणारे डॉ. गोयल यांच्या …

Read More »

शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या वरद हस्तामुळे एमसीएने थकविले १३ कोटी ६२ महिन्यापासून पोलिसांकडून प्रयत्न, मात्र पदरात छदामही नाही

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण आणि विविध प्रश्नी राज्य सरकारकडे धाव घेणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी गेल्या ६२ महिन्यापासून मुंबई पोलिस दलाचे १३ कोटी ४२ लाख रूपये थकविले आहेत. या दोन्ही राजकिय नेत्यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएवर वरदहस्त …

Read More »

घोटाळाकार नीरव मोदीच्या औरंगाबादेतल्या शोरूमवर ईडीची धाड सकाळपर्यत कारवाई चालण्याची शक्यता

औरंगाबाद : जगदीश कस्तुरे पंजाब नँशनल बँकेत ११ हजार कोटी रूपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या निरव मोदीच्या औरंगाबादेतील गीतांजली शोरूमवर आज ईडीने धाड टाकली. मोदीचे शोरूम प्रोझोन मॉल मधील गीतांजली कंपनीची रत्ने विकणार्‍या शोरुमवर धाड टाकण्यात आली असून ईडीचे सहाय्यक संचालक आणि काही जवाहिरांच्या पथकाने धाड टाकली असल्याचे समजते. …

Read More »

‘महाराष्ट्र सरकारचे मँग्नेटीक‘ उध्दव ठाकरेंना खेचू शकले नाही ठाकरेंच्या गैरहजेरीत महाउद्योगरत्न सन्मान रजनीला सुरूवात

मुंबई : प्रतिनिधी राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचविण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने आयोजित केलेल्या मँग्नेटीक महाराष्ट्र या कार्यक्रमाकडे सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पाठ फिरवली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उध्दव ठाकरे यांना विशेष पाहुणे म्हणून राज्य सरकारकडून निमंत्रित करण्यात आले होते. मात्र ठाकरे हे गैरहजर राहील्याने या कार्यक्रमातील मँग्नेटीक …

Read More »

अतिरेक्यांकडून ठार झालेल्यांना आपण शहीद मानत नाही : साध्वी प्रज्ञासिंग जास्तीत जास्त मुले जन्माला घालून माझ्याकडे द्या: नागरीकाना आवाहन

औरंगाबाद : प्रतिनिधी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांकडून ठार झालेल्यांना आपण शहीद मानतच नसल्याचे खळबळजनक वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून जामीनावर बाहेर आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग हीने सोमवारी औरंगाबादेत केले. त्यामुळे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि त्यांच्या अंकित संघटनांचा कथित देशप्रेमाची भूमिका उघडकीस आली. शिवजयंती आणि जनूभाऊ रानडे यांच्या स्मृतीदिना निमित्त सिडकोतील संत तुकाराम …

Read More »

कधी होणार स्मारक? भाजपकडून राजकारणासाठी शिवाजी महाराज व डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा वापर : विखे-पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी फक्त राजकारण करण्यासाठी आणि मते गोळा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणीच्या घोषणा भाजप सरकारकडून केल्या जात आहेत. मात्र हे दोन्ही स्मारक केव्हा होणार असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारला विचारला. रविवारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेत बोलताना पंतप्रधानांनी अरबी …

Read More »

भाजप सरकारचा ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नव्हेतर ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजप सरकारने राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ जरी आयोजन केलेले असले तरी या सरकारने यापूर्वीच ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ निर्माण केल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. सोमवारी लोणी येथे शिवजयंती समारोहानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी अनेक मुद्यांच्या आधारे सरकारवर जोरदार तोफ डागली. आज संपूर्ण राज्यात …

Read More »