Breaking News

रिझर्व्ह बँकेच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे लोकांवर कर्जाचा बोजा वाढणार रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरातच पेट्रोल-डिझेल आणि गॅससह जीवनाश्वय वस्तुंचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना आज अचानक रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत रेपो दरात मोठी वाढ केली आहे. यामुळे ईएमआयधारक असलेल्या कर्जदारांवरील कर्जाच्या आर्थिक बोजामध्ये वाढ होणार आहे. गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी, रेपो दरात …

Read More »

आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, पण भाजपा २७ टक्के आरक्षण देणार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून पाठीत खंजीर खुपसला आहे. तथापि, आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी मात्र २७ टक्के तिकिटे ओबीसींना देऊन या समाजाला न्याय देईल, अशी ग्वाही …

Read More »

संजय राऊत म्हणाले, भाजपा आणि मनसेमुळे हिंदू धर्मियांचा आज काळा दिवस भोंग्यामुळे काकड आरत्या बंद झाल्याने

भाजपाने मनसेला पुढे करून भोंग्याचा विषय आणून गोंधळा घालण्याचा प्रयत्न केला. गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार राज्यातील तीर्थस्ताने आणि श्रध्दास्थांनावर सकाळच्या काकड आरत्या होतात. या आरत्यांना लोकांना प्रवेश दिला जातो. मात्र भोंग्याचा विषय निर्माण झआल्यामुळे या संपूर्ण देवस्थांनावर लाऊड स्पीकर लागले नाहीत त्यामुळे पंचक्रोशीतील लोकांनाही आनंद मिळतो. परंतु आज लाऊडस्पीकर न लागल्याने …

Read More »

“त्या” कायद्याला हात न लावता सर्वोच्च न्यायालय म्हणाले, निवडणूक प्रक्रिया सुरु करा राज्य निवडणूक आयोगाला आदेश

कोरोनामुळे आणि ओबीसी आरक्षणप्रश्नाची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची प्रक्रिया १५ दिवसात सुरु करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य निवडणूक आयोगाला दिले. मात्र राज्य सरकारने केलेल्या कायद्यांना कोणताही हात लावला नाही. त्यामुळे राज्यात रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया आता नव्याने सुरु होणार आहे. राज्यातील …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, विषय फक्त मस्जिदींचा नाहीतर मंदिरांचाही आहे भोंग्यावरून पुन्हा राज ठाकरेंनी मांडली भूमिका

भोंग्यामुळे लोकांना जो दिवसभराचा त्रास होतो तो बंद होईल ही अपेक्षा आहे. हा विषय फक्त मशिदीवरील भोंग्यांचाच हा भाग नाही. मंदिरांवरचे ही आहेत अशी स्पष्टोक्ती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी करत मशिदींवरील भोंग्यांसाठी पोलिसांकडे इतके अर्ज आले इतक्याला परवानगी दिली, अशी माहिती दिली. आता मुंबईत, महाराष्ट्रात ज्या मशिदी आहेत त्या …

Read More »

राणा दाम्पत्याला राजद्रोहाच्या गुन्ह्यात अखेर जामीन मंजूर चौकशीला २४ तास आधी नोटीस द्यावी

हनुमान चालिसा म्हणण्यावरून अमरावतीच्या राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानासमोर जाणार असल्याचा इशारा दिला. तसेच पोलिसांनी नोटीस बजाविल्यानंतरही राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घराकडे जाण्याचा हट्ट धरल्याने राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आज अखेर राणा दाम्पत्याला प्रत्येकी ५० हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर मुंबई विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. …

Read More »

संजय राऊत म्हणाले, आधी सुपारी देण्याचा शोध घेतला पाहिजे भाजपावर साधला निशाणा

एखाद्या राजकीय पक्षाला महाराष्ट्राची शांतता बिघडवायची असेल आणि त्यांना कोणी सुपारी दिली असेल तर सरकारने आधी सुपारी देणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे. हिंदू ओवेसींना सुपारी देऊन महाराष्ट्रातील शांतता बिघडण्यासाठी जे काही सुरु आहे त्यासाठी सरकार सक्षम आहे. मी काल मुख्यमंत्र्यांशी बराच वेळ चर्चा केली. सगळं शांत आहे. कोणी मनात आणलं म्हणून …

Read More »

हनुमान चालिसा म्हणणाऱ्यावर राष्ट्रद्रोह तर आदेशाचे पालन करणाऱ्यांवर वरंवटा कायदा मोडण्याऱ्यांना साथ देणे आघाडी सरकारने बंद करावे

हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केल्यावर महाविकास आघाडी सरकारने एक खासदार व एका आमदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असे सांगणाऱ्यांवर आघाडी सरकार कारवाईचा वरवंटा फिरवत आहे. महाविकास आघाडी सरकारने कायदा मोडणाऱ्यांना साथ देणे बंद करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केले. …

Read More »

गुप्तचर विभागाचा इशारा, बाहेरचे लोक येवून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट पोलिसांच्या बैठकीत गुप्तचर विभागाची माहिती

एकाबाजूला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील मस्जिदींवरील भोंग्याचा विषय लावून धरला असतानाच आणि त्यासाठी ४ मे चा अल्टीमेटम दिलेला असताना यापार्श्वभूमीवर राज्यात इतर राज्यातील लोक येवून कायदा व सुव्यस्था बिघडविण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाने राज्य सरकारला दिली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा पोलिस महासंचालकांना फोन, योग्य कारवाई करा गृहमंत्री गिलीप वळसे-पाटील यांनी बैठक घेतल्यानंतरची मोठी घडामोड

मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस उच्च अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी फोनद्वारे चर्चा …

Read More »