Breaking News

भाडेपट्ट्याच्या शासकीय जमिनींचा भाडेपट्टा दर लवकरच कमी करणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनींवरील गृहनिर्माण सोसायट्या, विश्वस्त संस्था व इतर जमिनींना आकारण्यात येणारे भाडेपट्टा दर कमी करण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना देत नागरी क्षेत्रातील अकृषिक कर हा रेडिरेकरनच्या ३ टक्के वरून ०.०५ टक्के …

Read More »

सत्य दडवण्यासाठी ‘भीमा-कोरेगाव’च्या चौकशी समितीत मुख्य सचिव विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सरकारवर टिकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी भीमा-कोरेगाव दंगलीबाबतचे सत्य सरकारला दडवायचे असून, त्यासाठीच राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीत राज्याच्या मुख्य सचिवांचा समावेश झाल्याचे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले आहे. या हिंसाचाराच्या चौकशीसाठी व्दिसदस्यीय चौकशी समिती नेमण्याबाबत सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, मुळात या गंभीर प्रकरणाची …

Read More »

भीमा कोरेगांव प्रकरणी मुख्य न्यायाधीशांनी राज्य सरकारची विनंती फेटाळली आमच्याकडे न्यायाधीशांची संख्या कमी असल्याने निवृत्त न्यायाधीश नियुक्ती करा

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगांव येथे १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. यासाठी एखाद्या न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची मागणी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना केली. मात्र आमच्याचकडे न्यायाधीशांची कमतरता असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने राज्य सरकारची विनंती …

Read More »

ऑनस्क्रीन व्हॅलेंटाइन कपल पण प्रेक्षकांना भेटणार १६ मार्चला

मुंबई : प्रतिनिधी ‘कॅाफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची फेव्हरेट आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावल्याने ही जोडी पुन्हा कधी एकत्र येते याची जणू उत्सुकताच प्रेक्षकांना लागलेली असते. व्हॅलेंटाइन डे जवळ आला असून सध्या सगळीकडे याच …

Read More »

प्रथमच एकत्र दिसणार आमिर आणि रणवीर चित्रपट कि जाहिरातीत ?

मुंबई : प्रतिनिधी मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खानचं नाव आज सगळीकडे गाजतंय. कोणत्याही व्यक्तिरेखेला अचूक न्याय देण्यात तरबेज असणाऱ्या आमिरच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनेता रणवीर सिंहही वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ या चित्रपटामध्ये सर्वांनाच त्याचा प्रत्यय आला आहे. नकारात्मक भूमिकेतही रणवीरच जास्त …

Read More »

राज्य सरकारचे आदेश असतानाही तूर नाकारण्याच्या घटना शेतकऱ्यांनी तूर जाळून केला निषेध

औरंगाबाद : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा घोळ गेल्या वर्षी प्रमाणे यंदा देखील मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरु आहे. खरेदीची मर्यादा आणि दरामधील तफावत यामुळे शेतकऱ्यांचे खरेदी केंद्रावर खडके उडत आहेत. शुक्रवारी  औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर खरेदी केंद्रावर दहा शेतकऱ्यांनी आणलेली तूर चाळण न करता रिजेक्‍ट करण्यात आली. त्यामुळे संतप्त …

Read More »

उच्च न्यायालयाच्या रट्ट्यानंतर शिक्षण खात्याला जाग अखेर मुंबईतील शिक्षकांचे पगार स्टेट बँकेतून देण्याची शिक्षण मंत्र्यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी भाजपमय झालेल्या प्रविण दरेकरांच्या मुंबै सहकारी बँकेला वाचविण्यासाठी मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन मुंबै बँकेतून देण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला. या निर्णयावरून मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारल्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतून देण्याची अखेर भूमिका शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतली. तसेच या …

Read More »

राज्यातील २ कोटी ८० लाख मुलांना जंतनाशक गोळी देणार राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सरकारकडून मोहीम आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून उद्यापासून १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय जंतांनाशक दिन साजरा करण्यात येणार आहे.  या उपक्रमात राज्यातील वय वर्ष १ ते १९ वयोगटातील सुमारे …

Read More »

अखेर उच्च न्यायालयाचा शालेय शिक्षण विभागाला तडाखा मुंबै बँकेतून शिक्षकांचे पगार देण्यास न्यायालयाची मनाई

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील शिक्षकांचे पगार भाजपचे विद्यमान आमदार प्रविण दरेकर यांच्या मुंबै बँकेतून करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई करण्याचे आदेश आज दिले. यासंदर्भात शिक्षक भारती संघटनेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले. मुंबै जिल्हा सहकारी बँकेतून मुंबईसह राज्यातील शिक्षकांचे पगार देण्याबाबत …

Read More »

आणि राज्य सरकारची वेबसाईट क्रँश झाली लाखो नागरीकांची झाली निराशा

मुंबई : प्रतिनिधी डिजीटल महाराष्ट्राचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यात महाराष्ट्र सरकारच्या संपूर्ण निर्णयाची माहिती पोचविणारे राज्य सरकारच्या मालकीचे महाराष्ट्र हे संकेतस्थळ क्रँश झाले. त्यामुळे राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी संकेतस्थळावर धाव घेणाऱ्या लाखो नागरीकांची मोठी निराशा झाल्याने नागरींकामध्ये नाराजी निर्माण झाली. राज्य सरकारच्या जवळपास ३६ विभागांसह नव्याने निर्माण झालेल्या आणखी …

Read More »