Breaking News

आणि ऐन अर्थसंकल्पातच शेअर बाजार कोसळला शेअर्स नफ्यावर द्यावा लागणार कर

मुंबईः प्रतिनिधी संसदेत अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी देशातील शेअर बाजार चांगलाच वधारला होता. मात्र, अर्थसंकल्पात दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कर (लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स) आकारण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण सुरू झाली. सेन्सेक्स ३५ हजार ५२६ पर्यंत खाली आला होता. तर निफ्टीही १० हजार ९२१ पर्य़ंत घसरला. दुपारनंतर …

Read More »

केंद्राने जनतेला काय दिले… अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

काय महागणार मोबाईलवरील कस्टम ड्युटी वाढल्यामुळे मोबाईल महागणार. टी.व्ही.वरील कस्टम ड्युटीत वाढ केल्याने टी.व्ही महागणार. शिक्षण व आरोग्याच्या सेवेच्या सेसमध्ये १ टक्क्यांनी वाढ केल्याने या दोन्ही सेवा महागणार. शेती कंपन्यांना करात १०० टक्के माफी- या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना होण्याऐवजी शेती क्षेत्रात पदार्पण केलेल्या रिलायन्स, गोदरेज, एअरटेल सारख्या कंपन्यांना होणार. २५० …

Read More »

अर्थसंकल्पाने केली नोकरदार आणि महिलांची निराशा नोकरदारांना कोणताही कर दिलासा नाही

नवी दिल्लीः प्रतिनिधी सर्वसामान्यांसह नोकरदार वर्गाचे डोळे लागलेल्या देशाच्या अर्थसंकल्पातून काही तरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र कर आकारणीच्या कोणत्याही रचनेत बदल न करता आहे, तोच ठेवण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत आज गुरूवारी अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यामुळे नोकरदार वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी …

Read More »

अखेर मागासवर्गीयांचे आरक्षण वाचविण्यासाठी आली राज्य सरकारला जाग पदोन्नतीतील कर्मचाऱ्यांची माहीती जमा करण्याचे अवर सचिव, कक्ष अधिकाऱ्यांना आदेश

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेत असलेल्या सर्व मागासवर्गीयांना पदोन्नतीत देण्यात आलेले आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरविले. मात्र राज्य सरकारच्या निर्णयाचा फायदा किती मागासवर्गीयांना झाला याची माहिती न्यायालयात सादर करून पदोन्नतीतील आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने मुदतीनंतर धावाधाव सुरु केली असून सर्व विभागांच्या अवर सचिव आणि कक्ष अधिकाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण मिळविणाऱ्यांची …

Read More »

‘सोन चिरैया’मध्ये सुशांत बनला डाकू अभिषेक चौबेचा नवा चित्रपट

मुंबईः प्रतिनिधी ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आजवरचा प्रवास उलगडणारा सुशांतसिंह राजपूत आजवर कधीही न पाहिलेल्या गेटअपमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘डेढ इश्किया’ आणि ‘उडता पंजाब’ फेम दिग्दर्शक अभिषेक चौबे सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत. या चित्रपटाचं …

Read More »

उपनगरीय रेल्वे-मेट्रोच्या डब्यांची लातूरमध्ये निर्मिती होणार रेल्वेमंत्र्यांच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

मुंबई : प्रतिनिधी लातूर येथे उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज झालेल्या भेटीत दिली. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्री गोयल यांचे आभार मानले. सह्याद्री या राज्य अतिथीगृहावर केंद्रीय रेल्वे मंत्री गोयल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी …

Read More »

महालक्ष्मी मंदिर परिसराच्या ८० कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता अद्ययावत माहिती देणारे स्मार्ट वाहनतळ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई : प्रतिनिधी कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवस्थान मंदिर परिसराच्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली. विकास आराखड्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या तीनही वाहनतळावर पार्किंगची अद्ययावत माहिती देणारे डिजिटल फलक उभारून स्मार्ट वाहनतळ उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. मुंबईतील …

Read More »

विकासात महाराष्ट्र आशियाचे नेतृत्व करेल संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील प्रमुख युरी अफानासिएफ यांचा आशावाद

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र दारिद्र्य निर्मुलनासह शाश्वत विकासाच्या कामात देशाचेच नाही तर पूर्ण आशियाचे नेतृत्व करेल असा विश्वास व्यक्त करून संयुक्त राष्ट्र संघाचे भारतातील प्रमुख युरी अफानासिएफ यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नियोजन विभागात दारिद्र्य निर्मुलनासाठी सुरु केलेल्या “ॲक्शन रुम” च्या महत्वाकांक्षी पावलाचे कौतुक केले. ॲक्शन रुमच्या उदघाटनानंतर सह्याद्री …

Read More »

गुजराती ‘व्हेंटिलेटर’मध्ये जॅकी श्रॅाफ मराठी चित्रपटाचा रिमेक आता गुजरातीत

मुंबईः प्रतिनिधी आजवर मराठीत यशस्वी झालेल्या बऱ्याच चित्रपटांचा रिमेक इतर भाषांमध्ये करण्यात आला आहे. मराठीचे हिंदी रिमेक होण्याचं प्रमाण इतर प्रादेषिक भाषांच्या तुलनेत जास्त आहे. मराठीचा गुजराती रिमेकही होण्याचं प्रमाण तर अत्यल्प आहे. या अत्यल्प प्रमाणात प्रियांका चोप्राची प्रोडक्शन कंपनी पर्पल पेबल पिक्चर्सची निर्मिती असलेला ‘व्हेंटिलेटर’ हा मराठी चित्रपटही सामील …

Read More »

आदित्य पांचोलीचा पबमध्ये धिंगाणा अटक आणि जामिनावर सुटका

मुंबईः प्रतिनिधी काही कलाकार आणि वाद यांचे नाते अतूट आहे. चित्रपटसृष्टीत सक्रिय असो, वा नसो हे कलाकार काही या ना त्या कारणांमुळे कायम चर्चेत राहतात. रील लाइफप्रमाणेच रियल लाइफमध्येही बॅड बॅायचे लेबल लागलेला आदित्य पांचोलीही त्यापैकीच एक आहे. आदित्य आणि वादविवाद यांचे जणू सावलीसारखे नाते आहे. यापूर्वीही बऱ्याचदा हाणामारी आणि …

Read More »