Breaking News

महारेराच्या विरोधात ग्राहकांना आता दाद मागता येणार महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणला अपिलावर सुणावनी घेण्याचे सरकारचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांच्या होत असलेल्या फसवणूकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या गृहनिर्माण कायद्यातील तरतूदीनुसार महारेरा कायद्यांतर्गंत प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र या प्राधिकरणाकडे स्वतःची न्यायप्रणाली नसल्याने सध्या महारेराच्या निकाला विरोधात दाद मागण्यासाठी महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाकडे जबाबदारी सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बांधकाम व्यावसायिकांवर जरब बसविण्यासाठी …

Read More »

श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर एका वर्षात देशाच्या संपत्तीत २५ टक्क्याने वाढ

नवी दिल्लीः प्रतिनिधी जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर आला असून भारताची एकूण संपत्ती ८ हजार २३० अब्ज डॉलर असल्याची माहिती न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालातून समोर आली आहे. न्यू वर्ल्ड वेल्थने जगातील श्रीमंत देशांची यादी जाहीर केली असून या यादीनुसार श्रीमंत देशांमध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. वर्ष २०१७ …

Read More »

चळवळीच्या मजबूतीसाठी विचारवंतासह अर्थिक सुबत्ता गरजेची सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांचे मत

नवी मुंबईः प्रतिनिधी भिमा कोरेगाव घटनेनंतर ज्यांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधातला राग व्यक्त केला. त्यांना सोडविण्यासाठी जे जामिन राहीले. वकीलांनी मोफत सेवा दिली. आपल्या समाजावरील अन्याया विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करावा असे कोणत्याही समाजधुरीणांना वाटले नाही. त्यांना जे जमलं नाही ते जयभिम ग्रुपच्या रिक्षा चालक संघटनेनं केल असून त्यांचा सन्मान करावा …

Read More »

सव्वाशे कोटींच्या घरात ‘पद्मावत’ पहिल्या सहा दिवसातच शंभर कोटीचे उड्डाण

मुंबईः प्रतिनिधी निर्माता–दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ प्रदर्शित होऊन पाच दिवस लोटले तरी या चित्रपटाच्या मागे लागलेला वाद काही थांबायला तयार नाही. विरोध, आरोप–प्रत्यारोप आणि पाठिंब्याच्या या गदारोळात फार कमी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊनही ‘पद्मावत’ने सव्वाशे कोटींच्या घरात मजल मारली आहे. पाच दिवसांमधील हा आकडा पाहता कोणत्याही …

Read More »

धर्मा पाटील प्रकरणाचा अहवाल ८ दिवसात सादर करा मुख्यमंत्री फडणवीस यांचे मुख्य सचिवांना निर्देश

मुंबईः प्रतिनिधी जळगावमधील शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकरणाची मुक्य सचिवांकडून चौकशी केली जाणार असून येत्या आठ दिवसांत याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला होता. धर्मा पाटील यांचे प्रकरण घडले तेव्हा मुख्यमंत्री डाव्होसच्या परिषदेच्या घाईत होते. त्यामुळे मंत्रालयात …

Read More »

जे.पी.दत्ता पुन्हा मनामनांत जागवणार राष्ट्रभक्ती पलटनच्या निमित्ताने आणखी एक युध्दपट

मुंबईः प्रतिनिधी प्रत्येक दिग्दर्शकाची चित्रपट बनवण्याची आपली एक शैली असते. कोणी वास्तवदर्शी चित्रपट बनवण्यासाठी ओळखला जातो, तर कोणी फँटसीसाठी फेमस असतो… कोणी बड्या स्टारकास्टसह रुपेरी पडद्यावर ग्लॅमर आणण्यात मग्न असतो, तर कोणी प्रकाशझोतात न आलेल्या कलाकारांनाही चान्स देत वेगळा प्रयत्न करतो… कोणी इतिहासावर, तर कोणी राजकारणावर सिनेमे बनवतो. या सर्वांपेक्षा …

Read More »

तुमच्या खुर्च्याही जळतील, त्या फायरप्रुफ नाहीत ! वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी शिवसेनेला सुनावले

मुंबईः प्रतिनिधी धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्त्येच्या मुद्द्यावरून मंगळवारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याचाच आधार घेत शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखाचा वापर करत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला हाणला. धर्मा पाटील यांच्या चितेने सरकारच्या खुर्च्या जळतील तेव्हा तुमच्याही खुर्च्या जळतील. त्या काही फायरप्रुफ नाहीत, …

Read More »

ग्रामीण भागातील मुली-महिलांना ५ ते ३० रूपयात सॅनेटरी नॅपकिन मिळणार अस्मिता योजनेंतर्गत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या मुली आणि महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकिन माफक दरात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या नॅपकिन अस्मिता योजनेंतर्गत ५ रूपयांपासून ते ३० रूपयांपर्यत महिला व मुलींना देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाव्दारे ग्रामीण …

Read More »

उद्योग विभागाचे प्रस्ताव माझ्याकडे येणार की थेट तुमच्याकडेच उद्योगमंत्री देसाईंसह तीन सेना मंत्र्यांकडून मंत्रिमंडळ बैठकीतच मुख्यमंत्र्यावर प्रश्नांचा भडीमार

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील उद्योगासंदर्भात माझ्याकडे खाते आहे. जे कोणी अदानी, अंबानी यांच्या फाईली असतील तर त्या काय थेट तुमच्याकडेच येणार का असा सवाल उपस्थित करत माझ्या विभागाकडेही या फाईली आल्या पाहिजेत अशा स्पष्ट शब्दात शिवसेनेच्या कोट्यातून उद्योग मंत्री असलेले सुभाष देसाई हे मुख्यमंत्र्याचे खास मंत्री म्हणून ओळखले जातात मात्र आज …

Read More »

कर्जमाफी झालीय, मग लाभार्थी कसे सापडत नाहीत खासदार राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या घोषणेचे लाभार्थीच सापडत नसल्याचे सांगत लाभार्थी माहीत होण्यासाठी राज्य सरकारने कर्ममाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली. मंत्रालयात आज आलेल्या खा. राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना …

Read More »