Breaking News

बोंड अळी, ओखी वादळ नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे मागणी राज्य सरकारने मागितले केंद्राकडे २ हजार ४२५ कोटी रूपये

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कापूसावरील बोंड अळी आणि ओखी वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यानुसार राज्य सरकारने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केली. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने केंद्राकडे मदत मागण्यात आल्याची …

Read More »

भिमा कोरेगाव प्रकरणाची जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी भिमा कोरेगाव प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश आहे. याप्रकरणाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत असतानाही हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळण्यात अपयश आल्याने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. दादर येथील …

Read More »

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंती कार्यक्रमाला परवानगी नाकारली मुख्यमंत्री केजरीवाल येणार असल्याने परवानगी नाकारल्याची ब्रिगेडीयर सावंत यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी २०१८ रोजी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र या कार्यक्रमास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उपस्थित राहणार असल्याने बुलढाणा पोलिसांनी या कार्यक्रमालाच परवानगी नाकारल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ये ब्रिगेडियर सुधीर सावंत …

Read More »

महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी आता मॅग्नेटीक महाराष्ट्र फेब्रुवारीत होणाऱ्या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारने मेक इन महाराष्ट्रनंतर पुन्हा एकदा मॅग्नेटीक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा कार्यक्रम १८ ते २० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासंदर्भात नरीमन पॉंईट येथील हॉटेल ट्रायडंट …

Read More »

महाराष्ट्र बंद प्रकरणी ५ हजार दलित कार्यकर्त्यांना अटक कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठी संघटनांची धावाधाव

मुंबईः प्रतिनिधी कोरेगांव भिमा येथे उसळलेल्या दंगलीच्या निशेधार्थ दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या कालावधीत जवळपास राज्यभरातील पाच हजार दलित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. महाराष्ट्र बंदच्या कालावधीत काही ठिकाणी दलित कार्यकर्त्यांकडून बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. त्या …

Read More »

कुडाळकरांची ‘विच्छा पुरी होणार’ कै. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा 'विच्छा माझी पुरी करा' ने शुभारंभ

मुंबईः प्रतिनिधी राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत, प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे ‘विच्छा माझी पुरी करा‘ हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. कै. वसंत सबनीस लिखित आणि कै. दादा कोंडके यांनी अजरामर केलेल्या या चिरतरुण लोकनाट्याची पर्वणी आता कुडाळमधील रसिकांना लाभणार आहे. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा शुभारंभ ‘विच्छा …

Read More »

वैभव बनला स्वामी देवा शप्पथ मालिकेत पाहयला मिळणार

मुंबईः प्रतिनिधी विनोदी अभिनेता अशी ख्याती असलेल्या वैभव मांगलेने नेहमीच प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं आहे. केवळ विनोदी भूमिका न साकारता विविधांगी व्यक्तिरेखा साकारण्याकडे त्याच नेहमी कल असतो. याच कारणामुळे तो कधी हसवतो तर कधी रडवतो. इतकंच नव्हे तर वैभवचा खलनायकी रंगही प्रेक्षकांनी पाहिला आहे. हाच वैभव आता स्वामीच्या भूमिकेत समोर …

Read More »

कोरेगाव भिमा घटनेच्या चौकशीसाठी न्यायमुर्तीची नेमणूक लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली प्रभारी न्या. विजया ताहिलरमाणींची भेट

मुंबईः प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील दलितांवरील दगडफेकीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीची नेणूक करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानुसार या घटनेच्या चौकशीसाठी न्यायाधीशाची नियुक्ती करावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरामणींची भेट घेत त्यासंदर्भात विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार लवकरच …

Read More »

शेतमाल तारण कर्ज योजनेत शंभराहून अधिक बाजार समित्या पणन मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘शेतमाल तारण कर्ज योजना’ सुरु करण्यात आली. शेतमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतमालाला गोदाम आणि अत्यंत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या या योजनेत आतापर्यंत १०३ बाजार समित्यांनी सहभाग घेतला आहे. या योजनेंतर्गत चालू वर्षी ८६ हजार १६६ क्विंटल शेतमाल …

Read More »

कोरेगाव भिमा येथील घटनेमागे संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ शिव प्रतिष्ठानचा आरोप; भिडेंचा कार्यक्रम अखेर पोलिसांकडून रद्द

मुंबईः प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या मागे संभाजी भिडे यांचा हात नसून त्या मागे संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ या संघटनेचा हात असण्याची शक्यता आहे. तसेच १ जानेवारी रोजी भिडे हे कोरेगाव भिमा येथे नव्हते. त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी संबध असणे शक्यच नसल्याचा दावा शिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या मुंबई विभागाचे कार्यवाह …

Read More »